spot_img
spot_img
spot_img

“असे वक्तव्य करू नये”…रवींद्र धंगेकरांकडे पक्षाचा निरोप!

शबनम न्यूज | प्रतिनिधी

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या निवडणुका ग्रासरूट लेव्हलच्या असतात. कार्यकर्त्यांना लढायची इच्छा असते, परंतु अंतिम निर्णय हा वरिष्ठ नेतृत्त्व घेत असते. निर्णय झाल्यावर सर्व कार्यकर्त्यांनी शिस्त पाळावी. तसेच रविंद्र धंगेकरांनादेखील माझ्याकडून निरोप गेलेला आहे की महायुतीमध्ये कुठेही मतभेद होता कामा नये, कुठेही मिठाचा खडा पडता कामा नये, याची काळजी प्रत्येकाने घेतली पाहिजे. मी पुण्यात गेलो होतो तेव्हाही भाष्य केले होते, आजही करतो की प्रत्येक कार्यकर्त्याने महायुती जपली पाहिजे आणि महायुतीमध्ये बेबनाव होईल असे कृत्य, वक्तव्य करू नये, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.

एनडीए आणि महायुतीचे गठबंधन म्हणजे एकच विचारधारा आणि विकासाचा अजेंडा घेऊन पुढे जाणारे एकत्र कुटुंब आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सातत्याने विकासाचा आणि विचारधारेचा मार्ग दाखवला आहे.

आदेशच फॉलो करतो – धंगेकर

एकनाथ शिंदे यांनी दिल्ली येथे दिलेल्या प्रतिक्रियेवर माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी आपण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आदेशच फॉलो करत असल्याचे सांगत, आपण कोणत्याही पक्षावर बोलत नसल्याचे स्पष्टीकरण माध्यमांशी बोलताना दिले.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!