spot_img
spot_img
spot_img

गरजवंत शेतकऱ्यांना 106 गोधन दान उपक्रमात निखिल बोऱ्हाडे यांचाही मदतीचा हात

शबनम न्यूज | प्रतिनिधी

नुकतेच हिंदूभूषण स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष तथा भाजपा आमदार महेश लांडगे यांच्या पुढाकाराने मराठवाडा आणि सोलापूर सह अन्य जिल्ह्यातील पूरग्रस्त शेतकरी यांना 106 गाईंचे दान करण्यात आले. या उपक्रमात भाजपचे युवा नेते निखिल बोऱ्हाडे यांनीही मदतीचा हात पुढे करत एक हात मदतीचा उपक्रमा अंतर्गत पहिल्या टप्प्यात जीवनावश्यक वस्तू व अन्नधान्य स्वरूपात 50 गाड्या पूरग्रस्तांना मदत म्हणून पाठविण्यात आली. शंभरहून जास्त अधिक गावांमध्ये ही त्यांची मदत शेतकऱ्यांना मिळाली तर दुसऱ्या टप्प्यात गरजवंत शेतकऱ्यांना 106 गाईंचे दान करण्यात आले.या उपक्रमात निखिल बोऱ्हाडे यांच्या वतीने दोन गाई दोन टन चारा 200 किलो गोळी पेंड दोन वैद्यकीय किट दान करण्यात आल्या या उपक्रमाचे उद्घाटन भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या शुभहस्ते झाले.

विविध स्वयंसेवी संस्था संघटना उद्योजक व्यापारिक क्षेत्रातील संकलित केलेले गोधन पूजन करून पुरग्रस्त भागात रवाना करण्यात आले. यावेळी निखिल बोऱ्हाडे यांनी आपल्या प्रतिक्रिया देताना सांगितले की, शेती, माती आणि संस्कृती प्रती कटिबद्ध राहण्याची शिकवण धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांनी दिली. त्यांच्या स्टॅच्यू ऑफ हिंदू भूषण शंभू सृष्टी येथे गोधनाचे पूजन करण्यात आले. या उपक्रमात किमान 100 पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू उमटले ज्या दानशूर व्यक्तींनी या उपक्रमात सहभाग घेतला त्यांचे मनापासून आभार पूरग्रस्त शेतकरी कुटुंबांची आर्थिक घडी पूर्वत होण्यास मदत होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!