शबनम न्यूज | प्रतिनिधी
सरस्वती प्राथमिक विद्यालय,आकुर्डी पुणे ३५ या शाळेत,गुरुवार दिनांक ९/१०/२०२५ रोजी सकाळी १० ते ११.४५ या वेळेत शिशुवर्ग व बालवर्ग पालक सभेत,माननीय संस्थापक,सचिव माननीय गोविंदजी दाभाडे सरांनी मोलाचे मार्गदर्शन केले.
त्यासोबत लहान मुलांचे संगोपन कसे करायचे?त्यांना कसे बोलते करायचे?त्यांना बडबडगीते,कथा कोणत्या पद्धतीने शिकवायच्या? याबाबत प्रत्यक्ष कृतीने मार्गदर्शन केले.यात महिला पालकांसाठी सौ.सारिका आस्मर,सौ. प्रतिमा काळे मॅडम यांनी OHP शीट वर रांगोळी कशी काढायची याबाबत कृतीतून मार्गदर्शन केले.महिला पालकांनी आनंदाने,कार्यशाळेत सहभाग घेतला.सौ.शांता हारळे मॅडम यांनी प्रास्ताविक केले,श्री.प्रकाश कोळप सरांनी संगीत साथ दिली तर सौ.स्वाती जाधव मॅडम यांनी आभार मानले.