शबनम न्यूज | प्रतिनिधी
पिंपरी चिंचवड महानगरपालिका व उत्कर्ष मित्र मंडळ यांच्या सहकार्याने तसेच चैताली नकुल भोईर व नकुल आनंदा भोईर यांच्या वतीने आणि तालेरा हॉस्पिटल अंतर्गत मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच सोबतच आयुष्यमान कार्ड, आभा कार्ड देखील काढून देण्यात येणार आहे.
सदर तपासणी शिबिर गुरुवार दिनांक 9 ऑक्टोबर रोजी दुपारी 2 ते 4 अंतर्गत संपन्न होणार आहे. या रक्तदान शिबिरामध्ये रक्त तपासणी, बालरोगतज्ञ, मोफत औषध, फिजिशियन, स्त्री रोग तज्ञ असे विविध तपासणी यावेळी करण्यात येणार आहे.
सदर शिबिर उत्कर्ष हेल्थ अँड स्पोर्ट्स क्लब ,माणिक कॉलनी उत्कर्ष मित्र मंडळ लिंक रोड चिंचवड येथे आयोजित करण्यात आले आहे. तरी जास्तीत जास्त नागरिकांनी या तपासणी शिबिरात सहभागी होऊन शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.