spot_img
spot_img
spot_img

‘पिफ’ कडून विशेष ‘मान्सून एडिशन’

शबनम न्यूज , प्रतिनिधी :

पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाअंतर्गत (पिफदि११ आणि १२ ऑक्टोबर या दोन दिवशी राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयात विशेष मान्सून एडिशनचे आयोजन करण्यात आले आहेया उपक्रमाचे हे दुसरे वर्ष आहेमहाराष्ट्र शासन आणि पुणे फिल्म फाऊंडेशन यांनी याचे आयोजन केले आहेहा महोत्सव विनामूल्य असून, ‘प्रथम येणाऱ्यास प्राधान्य‘ या तत्त्वावर प्रवेश देण्यात येणार आहेअशी माहिती पिफच्या आंतरराष्ट्रीय सिनेमा निवडच्या उपसंचालिका आदिती अक्कलकोटकर यांनी पत्रकाद्वारे दिली.

 

त्या म्हणाल्या कीया महोत्सवात रसिकांना सहा जागतिक चित्रपट पाहता येतीलशनिवारदि११ ऑक्टोबर रोजी दुपारी  वाजता The Time it Takes’, दिग्दर्शक फ्रान्सिस्का कोमेन्सिनी (फ्रान्सइटली)सायं.15 वाजता Plastic Guns’, दिग्दर्शक जीनक्रिस्टोफ म्युराइज (फ्रान्सआणि रात्री .१५ वाजता My Everything’,  दिग्दर्शक अॅनी सोफी बेली (फ्रान्सहे चित्रपट दाखविले जातीलरविवारदि१२ ऑक्टोबर रोजी दु वाजता Delirio’, दिग्दर्शक अॅलेक्झांड्रा लॅटिशेव्ह सालाझार (कोस्टारिकाचिली)सायं.३० वाजता The Wailing’, दिग्दर्शक पेड्रो मार्टिन सॅलेरो (स्पेनफ्रान्सअर्जेंटिनाआणि रात्री .३० वाजता Mongrel ’, दिग्दर्शक वि लियांग चियांगयू कियाओ यिन (तैवानसिंगापूरफ्रान्सहे चित्रपट दाखविले जातील.

 

या महोत्सवासाठी जगभरातून आलेल्या चित्रपटांतून या सहा चित्रपटांची निवड केली असूनविविध आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये हे चित्रपट प्रदर्शित झाले आहेतदरवर्षी होणाऱ्या पिफ‘ बरोबर रसिकांना मधल्या काळातही आंतरराष्ट्रीय चित्रपट पाहता यावेतया उद्देशाने मान्सून एडिशनचे आयोजन केले आहेअशी माहिती महोत्सवाच्या उपसंचालिका आदिती अक्कलकोटकर यांनी पत्रकाद्वारे दिली.  

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!