spot_img
spot_img
spot_img

चिंचवडमध्ये 22 सप्टेंबर 2025 ते 2 ऑक्टोबर 2025 दरम्यान चिंचवड नवरात्र महोत्सव!

शबनम न्यूज , प्रतिनिधी :
 महासाधू  श्री मोरया गोसावी यांच्या पदस्पर्शाने पावन आणि क्रांतीवीर चापेकर बंधूंच्या शौर्याने पुनीत झालेल्या चिंचवड नगरीमध्ये दिनांक 22 सप्टेंबर 2025 ते 2 ऑक्टोबर 2025 दरम्यान चिंचवड नवरात्र महोत्सवाचे आयोजन केले होते. त्यामध्ये भव्य मंदिर प्रतिकृती व साडेतीन शक्तीपीठ दर्शन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवाची सुरुवात स्व. गजानन चिंचवडे  यांनी 10 वर्षांपूर्वी केली होती. तेव्हापासून ही महोत्सव परंपरा अखंडपणे चालू आहे.
चिंचवड नवरात्र महोत्सव मध्ये विविध समाज उपयोगी कार्यक्रम व आरोग्य शिबिरांचे आयोजन नगरसेविका अश्विनी गजानन चिंचवडे पाटील यांच्याकडून करण्यात आले होते. त्यामध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिका तालेरा  हॉस्पिटल यांच्या सहयोगाने आयुष्यमान भारत कार्ड, आभा कार्ड शिबिराचे आयोजन करण्यात आले होते, त्यामध्ये 322 लाभार्थ्यांनी त्याचा लाभ घेतला. तालेरा हॉस्पिटलमार्फतच स्वस्थ नारी सशक्त परिवार या अभियानांतर्गत 115 नागरिकांनी आरोग्य चिकित्सा व औषध उपचारांचा लाभ घेतला.
 निसर्गोपचार तज्ञ  खोसे चिंचवड यांच्या सहयोगाने एक्यूप्रेशर, एक्यू पंक्चर व निसर्गोपचार यादेखील शिबिराचे आयोजन केले होते. त्यामध्ये 59 लाभार्थ्यांनी शिबिराचा लाभ घेतला.  रोटरी क्लब ऑफ आकुर्डी तर्फे सौजन्य मेडिकव्हर  हॉस्पिटल, इंद्रायणी नगर,  भोसरी  यांच्यामार्फत बीपी शुगर तपासणी व मोफत वैद्यकीय सल्ला या शिबिराचा 78 लोकांनी लाभ घेतला. मोफत नेत्र चिकित्सा शिबिर व माफक दरात चष्मे वाटप या शिबिरांतर्गत 138 लोकांनी लाभ घेतला. अशा विविध मोफत शिबिरांचे  आयोजन करण्यात आले होते.  अशी माहिती चिंचवड नवरात्र महोत्सव संयोजिका माजी  नगरसेविका अश्विनी गजानन चिंचवडे- पाटील यांच्या तर्फे देण्यात आली.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!