महिलांच्या उद्योजकता आणि सामर्थ्याचा १७ वर्षांचा सोहळा!
शबनम न्यूज , प्रतिनिधी :
दरवर्षी प्रमाणे या वर्षीही कै. मनीषा भाऊसाहेब भोईर ट्रस्ट आणि पिंपरी चिंचवड महिला बचत गट महासंघ यांच्या वतीने दि. ०४ ते १२ ऑक्टोबर २०२५ दरम्यान प्रेमलोक पार्क, चिंचवड येथे ‘आठवडा बाजार’ चे आयोजन करण्यात आले आहे. त्याचे उदघाट्न माजी विरोधी पक्षनेता भाऊसाहेब भोईर यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाले.
हा आठवडा बाजार म्हणजे केवळ प्रदर्शन नव्हे, तर महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंसाठी एक मोठे व्यासपीठ आहे. वस्तूंचे प्रदर्शन, विक्री आणि चविष्ट खाद्य महोत्सवाच्या माध्यमातून महिलांच्या कलागुणांना वाव मिळाला आहे. महिलांमध्ये व्यवहार कौशल्य आणि व्यावसायिकता याबाबत यामुळे निश्चित च वाढीस लागत आहे.
प्रामुख्याने महिलांसाठी आयोजित या आठवडा बाजाराचे हे सतरावे वर्ष आहे!
यावेळी माजी नगरसेविका मंगलाताई कदम व वैशाली काळभोर आणि पिंपरी चिंचवड महिला बचत गट महासंघाच्या अध्यक्षा किरण हर्षवर्धन भोईर या उपस्थित होत्या. तसेच परिसरातील महिला भगिनी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली.