शबनम न्यूज , प्रतिनिधी :
वर्णेकर युनिव्हर्सल फाउंडेशन आणि रुपीनगर तळवडे मित्रपरिवार यांच्यातर्फे सामाजिक बांधिलकी आणि कर्तव्य म्हणून सोलापूर येथील अति पूरग्रस्त बाधित लोकांसाठी योगदान.मदतीचा हात देण्यात आला . या मध्ये 1000 पेक्षा जास्त परिवारासाठी संपूर्ण अन्नधान्य व मेडिकल किट व्यवस्थादेण्यात आली.
. संपूर्ण देशाचा पोशिंदा असलेला शेतकरी वर्ग सर्वसामान्य यांना खऱ्या अर्थाने सोलापूर मध्ये अत्यंत न भूतो न भविष्य अशा संकटाला सामोरे जावे लागले अनेक शेतकऱ्यांचे पूर्ण संसार शेती आणि जनावरे यांना त्यांना मुकावे लागले. आयुष्यभर कष्ट करून करून उभा केलेला संसार क्षणामध्ये नाहीसा झाला अशा परिस्थितीमध्ये माणुसकी व सामाजिक बांधिलकी म्हणून रुपीनगर तळवडे परिसरातील व वर्णेकर फाउंडेशनचे सर्व सहकारी मित्र आणि एक गणेश मंडळ , प्रतिष्ठान व सामाजिक कार्यकर्ते यांनी एकत्र येऊन 1000 परिवाराचा जबाबदारी स्वीकारले.
श्रीकृष्ण मंदिर अहिल्या देवी होळकर प्रतिष्ठान, भीम क्रांती सामाजिक संस्था, श्री गणेश मित्र मंडळ, विरोचन बुद्ध विहार, यंग पावर क्लब तसेच अर्जुन पवार शामकांत सातपुते, रवी शेत संधी पंढरी सेठ गरुड, विशाल मानकरी शिरीष भाऊ उतेकर, संदीप जी जाधव, शंतनू भालेकर,या मान्यवरांनी व रुपीनगर तळवडे मधील अनेक ग्रामस्थांना यामध्ये सहभाग होता. सदर मदत ही सोलापूर जिल्हाधिकारी तसेच सोलापूर पोलीस अधीक्षक व तहसीलदार यांच्या मार्गदर्शनामध्ये सोलापूर मध्ये गरजू व बिकट परिस्थितीत असलेल्या परिवारापर्यंत पोहोचवण्याचे कार्य केले.