शबनम न्यूज | प्रतिनिधी
प्रभाग क्रमांक १९ आनंदनगर परिसरातील नागरिकांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी आमदार उमाताई खापरे यांच्या मार्गदर्शनाखाली मा. नगरसेवक शैलेश मोरे यांच्या पुढाकारातून प्रभागात नुकत्याच एका विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
या बैठकीस आमदार उमाताई खापरे, पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आरोग्य विभागाचे साबळे, सगर, झोपडपट्टी विभागाचे उपअभियंता पाडवी, अभियंता वनिता गवळे, पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी जगदाळे तसेच विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता भोसले आणि वकील सामाजिक कार्यकर्त्या ज्योती शिंदे, इम्तियाज कुरेशी स्थानिक कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.
नागरिकांनी पाणीपुरवठा, वीजपुरवठा, आरोग्य, झोपडपट्टी विभागातील समस्या तसेच मूलभूत सुविधांशी संबंधित मुद्दे यावेळी मांडले. यावर तत्काळ तोडगा काढण्यासाठी नगरसेवक मोरे यांनी प्रशासनाला सूचित केले. त्यावर संबंधित विभाग प्रमुखांनी तातडीने उपाययोजना करून नागरिकांना दिलासा देण्याचे आश्वासन दिले.
नगरसेवक शैलेश मोरे यांनी सांगितले की, “नागरिकांना मूलभूत सुविधा पुरवणे ही आमची प्राथमिक जबाबदारी आहे. या बैठकीत मांडलेल्या सर्व समस्यांवर तातडीने उपाययोजना करण्यात येतील. यापुढे देखील काही समस्या निर्माण झाल्यास त्या थेट पोहचविण्यासाठी विशेष हेल्पलाईन क्रमांक जारी केला आहे. आनंदनगर परिसरातील नागरिकांनी त्यांच्या समस्या ९९२२०००००९ या क्रमांकावर संपर्क साधून कळवाव्यात. त्या समस्या निवारणासाठी त्वरित प्रतिसाद मिळेल,
असे आवाहन मोरे यांनी केले आहे.