शबनम न्यूज | प्रतिनिधी
शिवसेना उपशहर संघटिका सौ. ज्योतीताई संदीप भालके यांच्या जिजाऊ सोशल फाउंडेशन वतीने गौरी गणपती सजावट स्पर्धेचे बक्षीस वितरण समारंभ व न्यू होम मिनिस्टर क्षण आनंदाचा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सदर कार्यक्रम शनिवार (दि. 4 ऑक्टोबर 2025 ) रोजी दुपारी साडेतीन वाजता संपन्न होणार आहे.
सदर कार्यक्रम शुभम बँक्वेट हॉल, आहेर गार्डन, वाल्हेकरवाडी चिंचवड येथे आयोजित करण्यात आले असून या कार्यक्रमात सहभागींना आकर्षक भेटवस्तू देण्यात येणार आहे. तसेच लकी ड्रॉ मार्फत पाच चांदीचे नाणे बक्षीस म्हणून देण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे निवेदन प्रसिद्ध निवेदक अक्षय मोरे करणार आहेत.
तरी या कार्यक्रमात जास्तीत जास्त महिला, भगिनींनी तसेच नागरिकांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन ज्योतीताई संदीप भालके यांच्या वतीने करण्यात येणार आहे.