शबनम न्यूज
नवनगर शिक्षण मंडळ आकुर्डी संचलित श्री सरस्वती प्राथमिक विद्यामंदिर आकुर्डी या शाळेमध्ये महात्मा गांधीजी जयंती, लाल बहादूर शास्त्री जयंती तसेच विजयादशमी शुभेच्छा समारंभ आनंदी उत्साही वातावरणामध्ये संपन्न झाला.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक/सचिव मा.श्री. गोविंदराव दाभाडे सर होते.इयत्ता चौथीचे वर्गशिक्षक नयना पाटील, माधुरी सोनवणे,अविनाश आखाडे, प्रकाश कोळप,प्राजक्ता बंडगर इ. शिक्षकांनी आयोजन केले होते. कार्यक्रमाला चौथीचे पालक वेदिका रेवाळे,अंजना कोंगळे उपस्थित होते. इ.चौथीचे विद्यार्थी शिवम कोळगिरे, अनिकेत गळगटे,संस्कार लवटे,पार्थ कदम या मुलांनी महात्मा गांधीजी व लाल बहादूर शास्त्री यांचा पोशाख परिधान केला होता त्यामुळे कार्यक्रमाचा आनंद द्विगुणित झाला. इ.चौथीच्या विद्यार्थ्यांनी ’ रघुपती राघव राजाराम ’हे गांधीजींचे आवडते भजन सादर करून कार्यक्रमाची सुरुवात केली त्यानंतर अनन्या भोसले,ईरण्णा धनशेट्टी,अर्पिता शिरढोणे,प्रणव मिसाळ या विद्यार्थ्यांनी भाषणे केली.शिक्षक मनोगतामध्ये अविनाश आखाडे यांनी महात्मा गांधीजींनी सत्य व अहिंसेच्या मार्गाने भारत देशाला कशाप्रकारे स्वातंत्र्य मिळवून दिले याबाबत माहिती दिली तसेच लाल बहादूर शास्त्री यांचे स्वातंत्र्य चळवळीमधील योगदान,ते पंतप्रधान असताना त्यांनी भारत देशासाठी केलेले कार्य याबाबत मुलांना माहिती दिली तसेच विजयाचे प्रतीक असलेल्या दसरा सणाबद्दल माहिती दिली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजवीर वाळके या चौथीच्या विद्यार्थ्यांनी केले.आभार चौथीचा विद्यार्थी आरमान पठाण याने मानले. संगीत शिक्षक प्रकाश कोळप यांनी कार्यक्रमाला संगीतमय साथ दिली.