पिंपरी-चिंचवड औद्योगिक परिसरात आज मोठ्या उत्साहात खंडे नवमी साजरी करण्यात आली. यानिमित्ताने फोरम ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशन तर्फे अध्यक्ष श्री. अभय दादा भोर यांच्या हस्ते यंत्रपूजनाचा कार्यक्रम पार पडला.
या प्रसंगी उपस्थित सर्व उद्योजक व कामगार बांधवांनी विशेषता आधुनिक युगातील रोबोट या यंत्राची देखील पूजा करण्यात आली यंत्रसामग्रीला नमस्कार करून आपल्या उपजीविकेच्या साधनांचा सन्मान केला. उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कामगार बांधवांचा सन्मान शाल श्रीफळ देऊन करण्यात आला
या वेळी अध्यक्ष श्री. अभय दादा भोर यांनी सांगितले की, उद्योगाच्या प्रगतीत कामगार आणि उद्योजक हे दोन आधारस्तंभ आहेत आणि आधुनिक रोबोट सारखे यंत्रसामग्रीला त्याचे प्रशिक्षण घेऊन कंपनीमध्ये प्रगती करण्यासाठी नवीन संधी निर्माण होत आहेत त्याचा सर्वांनी फायदा करून घ्यावा.”
या कार्यक्रमास असोसिएशनचे पदाधिकारी, उद्योजक प्रशांत पठारे महिला लघुउद्योजक संघटनेचे अध्यक्ष कु दुर्गा भोर रेश्मा मुल्ला कंपनी हेड चंद्रकांत बासलकर निरंजन मनवर आणि कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.