शबनम न्यूज | प्रतिनिधी
२७व्या पुणे नवरात्रौ महिला महोत्सवाची सांगता आज महाआरतीने संपन्न झाली. शिवदर्शन-सहकारनगर परिसरातील श्री लक्ष्मीमाता मंदिरात एक हजारहून अधिक महिलांनी श्री लक्ष्मीमातेची महाआरती केली. प्रारंभी देवीची गाणी सादर केली गेली. वेदिका निकम हिने जोगवा सादर केला. त्यानंतर महाआरती संपन्न झाली. तेव्हा सारे वातावरण मंगलमय झाले होते. त्यानंतर लकी ड्रॉ काढण्यात आला. एस. सरोदे (प्रथम क्रमांक), माला कांबळे (द्वितीय क्रमांक), पद्मा धनगर ( तृतीय क्रमांक) याशिवाय असंख्य उत्तेजनार्थ ५०हून अधिक महिलांना बक्षिसे देण्यात आली.
अशा प्रकारे हा २७वा पुणे नवरात्रौ महिला महोत्सव यशस्वी झाला. विविध स्पर्धांमध्ये ५०००हून अधिक महिला सहभागी झाल्या आणि हा महोत्सव यशस्वी केला, याबद्दल पुणे नवरात्रौ महोत्सवाचे आयोजक-अध्यक्ष आबा बागुल आणि पुणे नवरात्रौ महिला महोत्सवाच्या अध्यक्षा सौ. जयश्री बागुल यांनी सर्वांचे आभार मानले. कार्यक्रमानंतर सर्वांना प्रसाद देण्यात आला.