शबनम न्यूज | प्रतिनिधी
लोकप्रिय पार्श्वगायक मोहम्मद रफी हे कव्वाली, गझल, भजन, रोमँटिक गाणी, देशभक्तिपर गाणी, दर्दभरी गाणी, शास्त्रीय गाणी अशी वेगवेगळी लोकप्रिय गाणी गात त्यांनी ती अजरामर केली. हिंदी, उर्दू, पंजाबी, मराठी, तेलुगू अशा भाषांमध्ये त्यांनी गाणी गात ती प्रसिध्द केली. अशा महान गायकाची जन्मशताब्दी झाली. त्यानिमित्त पुणे नवरात्रौ महोत्सवात खास ‘बेमिसाल रफी’ हा गझल गाण्यांचा कार्यक्रम उत्साहात रंगला. मोहम्मद रफी यांच्या प्रतिमेस पुणे नवरात्रौ महोत्सवाचे आयोजक-अध्यक्ष आबा बागुल, गायक अली हुसेन, आनंद म्हसवडे, कल्याणी देशपांडे यांनी अभिवादन करीत कार्यक्रमाची सुरुवात ‘चाहूंगा मैं तुझे सांज सवेरे..’ हे गाणे गाऊन करण्यात आली.
“संयम व चिकाटी या गुणांची गरज असलेल्या नेटवर्क मार्केटिंग म्हणजेच डायरेक्ट मार्केटिंगच्या क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा वेगळा ठसा उमटविणाऱ्या नीलम कडुस्कर यांचा विशेष सत्कार याप्रसंगी आयोजक-अध्यक्ष आबा बागुल यांच्या हस्ते करण्यात आला. चांगली नोकरी सोडून त्यांनी नेटवर्क मार्केटिंगमध्ये काम सुरू केले आणि अंगभूत गुणांच्या आधारे गेल्या १० वर्षांत कमालीचे यश मिळविले. त्यातून अनेकांना प्रेरणा मिळेल,” असे आबा बागुल याप्रसंगी म्हणाले.
यानंतर झालेल्या ‘बेमिसाल रफी’ या कार्यक्रमात ‘शोधीसी मानवा..’ या गाण्याने गायक अली हुसेन यांनी कार्यक्रमाचे दिमाखदार गाणे गात प्रेक्षकांच्या टाळ्या मिळवल्या. त्यानंतर ‘दिल का भंवर करे पुकार..’, ‘कौन है जो सपनों में आया..’ ही गाणी सुरेल आवाजात गात गायक आनंद यांनी उपस्थितींचा मने जिंकली. गायक अली व गायिका कल्याणी यांनी एकत्रितरीत्या गायलेले ‘दिल पुकारे..’ गाण्याला प्रेक्षकांनी शिट्ट्या वाजवत साथ दिली. त्यानंतरच्या ‘कितना प्यारा वादा..’ गाण्याने जुन्या काळात प्रेक्षकांना नेले. ‘वो है जरा खफा खफा..’ गाण्याने रसिकांना मोहित केले. कार्यक्रमाच्या अखेरीस सर्व गायकांनी मिळून एकत्रित गायलेले ‘आज कल तेरे मेरे…’, ‘ओ हसीना…’, ‘आजा आजा…’ गाण्यांनी कार्यक्रमाची शोभा अधिकच वाढविली.
यावेळी गायकांना विविध गाण्यांना वादक केदार परांजपे (की-बोर्ड), अमृता ठाकुरदेसाई (की-बोर्ड), अतुल गर्दे (गिटार), विनोद सोनवणे (ड्रम), ऋतुराज कोरे (ऱ्हिदम मशीन), रोहित जाधव, पद्माकर गुजर (तबला), राकेश जाधव (साऊंड) यांनी साथ दिली. तर, या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सायरा अली हुसेन यांनी केले.
याप्रसंगी पुणे नवरात्रौ महिला महोत्सवाच्या अध्यक्षा सौ. जयश्री बागुल, घनश्याम सावंत, पुणे जिल्हा फुटबॉल असोसिएशनचे सचिव रशीद शेख, रमेश भंडारी, नंदकुमार बानगुडे, नंदकुमार कोंढाळकर, अमित बागुल, हर्षदा बागुल, सागर बागुल आदी उपस्थित होते.