शबनम न्यूज , प्रतिनिधी :
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका अश्विनीताई चिंचवडे यांच्यावतीने नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने नागरिकांसाठी मोफत आरोग्य शिबिर व मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले.
या आरोग्य शिबीर व नेत्र तपासणी शिबिरामध्ये नागरिकांनी मोठ्या प्रमाणात आपल्या आरोग्याची तपासणी करून घेतली तसेच अनेक नागरिकांनी नेत्र तपासणी करून घेतली. नेत्र तपासणी करणाऱ्या रुग्णांना ज्यांना आवश्यक असेल अशा रुग्णांसाठी चष्मे उपलब्ध करून देण्यात आले आहे.
दरवर्षी माजी नगरसेविका अश्विनीताई चिंचवडे यांच्या वतीने आरोग्य शिबीर व नेत्र तपासणी शिबिर आयोजित केले जाते यावेळीही त्यांच्या या आरोग्य शिबिराला नागरिकांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला.