शबनम न्यूज , प्रतिनिधी :
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे माजी नगरसेवक शैलेश मोरे यांच्या प्रयत्नांना यश आले असून शहरातील महानगरपालिकेचे प्रभाग क्रमांक 19 मधील पुणे मुंबई महामार्गावरील फिनोलेक्स चौक ते महावीर चौक येथील फुटपाट सुशोभीकरणाचे काम सुरू असल्यामुळे रस्त्याची दुरावस्था झाली. फिनोलेक्स चौक ते मोरवाडी येथील मेट्रो स्टेशनला जाणाऱ्या नागरिकांची या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात गर्दी असते, लहान मुले, वयस्कर महिला, यांची वर्दळ मोठ्या प्रमाणात असते, रस्त्यांची दुरावस्था झाल्याने अपघात होण्याची दाट शक्यता निर्माण झाली होती, या रस्त्यांची दुरावस्था झाल्यामुळे नागरिकांना येण्या जाण्यासाठी त्रास सहन करावा लागत होता, या रस्त्याची लवकरात लवकर दुरुस्ती करावी अशी मागणी माजी नगरसेवक शैलेश मोरे यांनी महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांच्याकडे केली, त्यांच्या या मागणीला यश आले असून रात्री उशिरा या रस्त्याचे काम सुरू करण्यात आले. व रस्ता वाहतुकीसाठी उपयुक्त करण्यात आला.