शबनम न्यूज | प्रतिनिधी
दोन दिवसांपूर्वी केरळ मधील स्थानिक टिव्ही डिबेट दरम्यान, केरळ भाजपाचे मुख्य प्रवक्ते पिंटू महादेवन यांनी भारताचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या छातीवर गोळ्या घालून ठार करण्यात येईल, अशी धमकी दिली होती. याविरोधात आज पिंपरी चिंचवड शहर युवक काँग्रेसच्या वतीने, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तांना भेटून रीतसर तक्रार व कारवाई करण्याची मागणी पिंपरी चिंचवड शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष कौस्तुभ नवले यांनी केली.
यावेळी कौस्तुभ नवले म्हणाले, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची हत्या करूनही ७५ वर्षात, भाजपाला प्रामुख्याने संघाला महात्मा गांधी समाज मनातून संपवता आले नाहीत. महात्मा गांधींचे विचारांचा प्रचार व प्रसार विरोधी पक्षनेते राहूल गांधी हे करत आहेत व त्याला जनसामान्यांच्या मोठा प्रतिसाद मिळात आहे. यामुळेच संघ परिवार व भाजपा नेते राहुल गांधी यांना संपवण्याची भाषा करत आहेत.
याविरुद्ध आज पोलीस आयुक्तांना भेटून रीतसर तक्रार व कारवाई मागणी करण्यात आली.
यावेळी पिंपरी चिंचवड शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष मा कौस्तुभ नवले, NSUI माजी. उपाध्यक्ष उमेश खंदारे, किरण नढे, रोहित शेळके, विशाल कसबे यांच्या सह पदाधिकारी उपस्थित होते.