शबनम न्यूज | प्रतिनिधी
इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठान निमसाखर ता इंदापूर संस्थेचे सचिव वीरसिंह विश्वासराव रणसिंग यांची संस्थाचालक शिक्षण मंडळ पुणे जिल्हा संचालक पदी बिनविरोध निवड झाली. सन २०२५ ते २०२८ कालावधीसाठी संचालक पदी त्यांची निवड झाली. संस्थाचालक शिक्षण मंडळाच्या संचालक पदी निवड झाल्याबद्दल संस्थेचे उपाध्यक्ष अनिल मेहेर यांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात आले.
यावेळी संस्थाचालक शिक्षण मंडळ अध्यक्ष विजय कोलते ,सहसचिव महेश ढमढेरे, संचालक प्रदीप वळसे पाटील,संचालक प्रमिला गायकवाड इ मान्यवर व पदाधिकारी उपस्थित होते.संचालक वीरसिंह रणसिंग यांनी संस्थाचालक शिक्षण मंडळ संस्थेची सन २०२१ साली सहाय्यक धर्मादाय आयुक्त पुणे कार्यालयात नोंदणी झाली असून संस्थेच्या माध्यमातून शहरी व ग्रामीण भागातील शिक्षण संस्थांना शासन जी मदत करेल त्याचबरोबर संस्थांच्या पातळीवर पुढाकार घेऊन विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासाचे व शैक्षणिक गुणवत्तेचे उपक्रम राबवण्याचे संस्थेने ठरवले आहे.शिक्षक व संस्थेचे प्रश्न सोडवण्यासाठी संस्थाचालक शिक्षण मंडळाच्या माध्यमातून शासन दरबारी पुढाकार घेऊन प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे रणसिंग यांनी सांगितले.
पुणे जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागातील १८० शिक्षण संस्था संस्थाचालक शिक्षण मंडळात सदस्य संस्था म्हणून सहभागी असून २१ संचालक यामध्ये कार्यरत आहेत.संस्थाचालक शिक्षण मंडळात तालुकानिहाय संचालकांना प्रतिनिधीत्व देण्यात आले आहे. मागील कार्यकारिणीमध्ये संचालक पदी कार्यरत राहिल्यामुळे इंदापूर तालुक्यातुन पुन्हा काम करण्याची संधी मिळाली असल्याने ग्रामीण भागातील संस्थाचालकांचे व शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी संस्थाचालक शिक्षण मंडळाच्या माध्यमातून प्रयत्न करणार असल्याचे विरसिंह रणसिंग यांनी सांगितले.संस्था चालक शिक्षण मंडळाने दाखवलेला विश्वास व काम करण्याची दिलेली संधी याबद्दल रणसिंग यांनी कार्यकारिणी पदाधिकारी यांचे आभार व्यक्त केले.रणसिंग यांची संस्थाचालक शिक्षण मंडळाच्या संचालक पदी निवड झाल्याबद्दल इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष आनंदी रणसिंग, उपाध्यक्ष प्रकाश कदम ,विश्वस्त शंकरराव रणसिंग,विश्वस्त कुलदीप हेगडे,विश्वस्त शिवाजीराव रणवरे,विश्वस्त वीरबाला पाटील, विश्वस्त राही रणसिंग, कळंब येथील विश्वासराव रणसिंग महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक काळंगे, उपप्राचार्य ज्ञानेश्वर गुळीग,माध्यमिक विद्यालय तावशीचे मुख्याध्यापक महादेव बागल,माध्यमिक विद्यालय म्हसोबाचीवाडी विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रमोद भोंग यांनी अभिनंदन केले.