spot_img
spot_img
spot_img

जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन

शबनम न्यूज | प्रतिनिधी

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन निमित्त १ ऑक्टोबर २०२५ रोजी विशेष कार्यक्रमाचे आयोजन चिंचवड येथील प्रा.रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह येथे सकाळी ९ ते सायंकाळी ५ यावेळेत करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे उदघाटन आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या हस्ते सकाळी ११ वाजता होणार आहे.

केंद्रीय सहकार व नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळमहाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांची विशेष उपस्थिती यावेळी असणार आहे. तसेच उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटीलक्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणेविधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हेविधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडेनगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांची देखील प्रमुख उपस्थिती असणार आहे. याशिवाय खासदार मेधा कुलकर्णीसुनेत्रा पवारसुप्रिया सुळेश्रीरंग आप्पा बारणेडॉ. अमोल कोल्हेआमदार अमित गोरखेउमा खापरेमहेश लांडगेशंकर जगतापमहाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती-जमाती आयोगाचे सदस्य ड. गोरक्ष लोखंडे तसेच माजी खासदारमाजी आमदारमाजी नगरसदस्यमाजी नगरसदस्या तसेच महापालिका अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटीलविजयकुमार खोराटेतृप्ती सांडभोर तसेच महानगरपालिकेतील विविध विभागप्रमुखविविध सामाजिक क्षेत्रातील पदाधिकारीकार्यकर्तेज्येष्ठ नागरिक संघाचे पदाधिकारीसदस्य यावेळी उपस्थित राहणार आहेत.  तरी मोठ्या संख्येने या कार्यक्रमात सहभागी व्हावेअसे आवाहन महापालिकेकडून करण्यात आले आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!