spot_img
spot_img
spot_img

अहिल्यानगर मध्ये कालच्या राड्यानंतर आज ओवैसींची सभा!

शबनम न्यूज | प्रतिनिधी

अहिल्यानगर मध्ये सोमवार (दि. २९) रोजी तणाव निर्माण झाला होता. त्यामध्ये रांगोळी वरून निर्माण झालेला वाद, धक्काबुक्कीची तक्रार, दंगलीसदृश्य परिस्थिती, यामुळे मोठा राडा झाला होता. यानंतर आज एआयएमआयएम पक्षाचे अध्यक्ष तथा खासदार असदुद्दीन ओवैसी यांची सभा होणार आहे. मुस्लिम बहुल असलेल्या मुकुंद नगर येथील त्यांच्या या सभेला पोलिसांनी अटी व शर्तींसह परवानगी दिली आहे.

अहिल्यानगर मध्ये झालेल्या राड्याच्या पार्श्वभूमीवर ओवैसी यांच्या सभेला परवानगी देण्यात आली नव्हती. मात्र, आता पोलीस प्रशासनाने ओवैसी यांच्या सभेस परवानगी दिली आहे. मात्र काही कडक अटी व शर्ती लावण्यात आल्या आहेत. त्यात सभेसाठी नागरिक कोणत्या मार्गाने येणार, याचे नियोजन करणे बंधनकारक आहे. सभेनंतर परतण्यासाठी स्वतंत्र मार्ग निश्चित करणे, ध्वनी प्रदूषण टाळण्यासाठी आवश्यक ती काळजी घेणे, सभास्थळी कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवणे आणि महत्त्वाचे म्हणजे ही सभा महानगरपालिका यांच्या परवानगीने घेण्यात यावी, अशा अटी शर्ती लावण्यात आले आहेत.

ही सभा आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आली आहे. काल ओवैसी यांनी कोल्हापूरमध्ये सभा घेतल्यानंतर आता अहिल्यानगर मध्ये त्यांच्या दौऱ्याला महत्त्व प्राप्त झाले. या सभेतून ओवैसी काय बोलणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. या सभेच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. कालच्या तणावपूर्ण घटनेनंतर शहरात निर्माण झालेल्या अस्वस्थतेच्या पार्श्वभूमीवर ही सभा शांततेत पार पाडणे, ही प्रशासनासाठी मोठं आव्हान ठरणार आहे.

असदुद्दीन ओवैसी यांच्या सभेसाठी घालून दिलेल्या अटी –

1) जाहिर सभा घेण्याकरीता आवश्यक लागणा-या परवानगी स्थानिक स्वाराज्य संस्था यांचेकडुन घेवुनच सभा घ्यावी. स्टेज, मंडप उभारणी, एम एस ई बी, पाकींग व्यवस्था, आरोग्य विभाग, अग्निशमक विभाग इत्यादी त्याबाबचे मंजुरी पत्र सादर करावे.

2) जाहिर सभा घेत असताना फायर ब्रिगेड, अॅम्ब्युलन्स, अती महत्वाचे वाहने, अत्यावश्यक वस्तु वाहतुक करणारे वाहने येण्या जाणेसाठी अडथळा होणार नाही याची दक्षता घेऊन पार्किंग व्यवस्था करावी. सदर पार्किंग ठिकाणी आपले स्वयंसेवक नेमावेत. वाहतुक पोलीसांच्या सुचनांचे पालन करावे.

3) आपले पक्षाचे खासदार अससुददीन ओवेसी यांना झेड वर्गवारीची सुरक्षा आहे. त्यामुळे सभेच्या ठिकाणी ४५ बाय ६० फुट लांबी रुंदीचे डी झोन तयार करुन स्टेजची व्यवस्था करावी. तसेच स्टेजवर बसणा-या प्रमुखांची नावांची यादी आगाऊ उपलब्ध करुन देवुन त्यांचे पास आमचेकडुन घ्यावेत. स्टेज सुरक्षामध्ये कोणताही निष्काळी पणा होणार नाही याची दक्षता घ्यावी.

4) सभेच्या ठिकाणी सुरक्षाच्या अनुषंगाने सभेचे ठिकाण चारही बाजुने सुरक्षीत करुन समक्ष दिलेल्या सुचनेप्रमाणे स्वतंत्र प्रवेश व्दाराची व्यवस्था करावी जेणेकरुन सुरक्षा अनुषंगाने सोयीचे होईल याबाबत काटेकोरपणे पालन करावे.

5) जाहिर सभेच्या अनुषंगाने लावण्यात येणारे झेंडे, पोस्टर्स व बॅनर्स याबाबत स्थानिक स्वराज्य संस्थेची स्वतंत्र पारवानगी घेवुन सादर करावी.

6) आपण लावण्यात आलेल्या झेंडे व पोस्टर्स व बॅनर्स व इतर जाहिरातीमुळे कोणत्याही धर्माच्या/जातीच्या भावना दुखवतील असे वक्तव्य अथवा देखावे अथवा विभिस्त किंवा मना दुखवतील असे गाणी पोस्टर्स लावू नयेत.

7) जाहिर सभा अयोजित करताना असताना कोणावरही आपले कार्यकर्ते जबरदस्तीने सहभागी करणार नाही याची दक्षता घ्यावी. जाहिर सभा ही शांततेने व सुरळीत पार पाडणेसाठी पोलीस ज्या ज्या वेळी मिटिंगसाठी बोलविले जाईल त्यावेळेस हजर राहुन त्यावेळी देणेत आलेल्या सुचनांचे तंतोतंत पालन करावे.

8) जाहिर सभा मध्ये महिला व मुली सहभागी असतील तर त्यांची गैर सोय होणार नाही याची दक्षता घ्यावी. शक्यतो महिला व पुरुष असे दोन वेगवेगळे भाग करावेत.

9) जाहिर सभा असताना प्रशासनाने ठरवून दिलेल्या जागेचा/मार्गाचा वापर करावा. जाहिर सभा घेण्यापुर्वी अथवा नंतर कोणतीही रॅली काढता येणार नाही. सभेकरीता येणारे वक्ते यांना झेड सुरक्षा असलेने त्यांना सुरक्षेच्या कारणास्तव कोठेही पोलीसांच्या परवानगी शिवाय दौ-यात बदल करता येणार नाही.

10) जाहिर सभा च्या वेळी अत्यावश्यक सेवा चालु राहितील तसेच आपले समर्थकाकडुन त्यास कोणताही अडथळा निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी.

11] जाहिर सभेच्या दरम्यान अथवा नंतर आपले कार्येकर्ते यांचेकडुन कोणत्याही शासकीय अथवा खाजगी मालमत्तेचे नुकसान होणार नाही याची दक्षता घ्यावी.

12] सभेच्या ठिकाणी लाईट, स्वच्छता,पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह, पार्किंग याची सभेला येणा-या नागरिकांचे प्रमाणात पुरेशी सोय करण्यात यावी.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!