spot_img
spot_img
spot_img

मालमत्ता करावरील ४ टक्के सवलतीचा लाभ घेण्याची शेवटची संधी!

शबनम न्यूज | प्रतिनिधी

 पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कर संकलन व कर आकारणी विभागाच्या वतीने मालमत्ता धारकांसाठी ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत मालमत्ता कराचा संपूर्ण भरणा ऑनलाइन स्वरूपात केल्यास सामान्य करावर ४ टक्के सवलत देण्यात येत आहे. या सवलतीचा लाभ घेण्यासाठी एक दिवस शिल्लक आहे. अद्यापही ज्या मालमत्ताधारकांनी चालू आर्थिक वर्ष २०२५-२६ चा मालमत्ता कर भरला नाहीत्यांनी तो ३० सप्टेंबर २०२५ पूर्वी भरून सवलतीचा लाभ घ्यावाअसे आवाहन पिंपरी चिंचवड महापालिकेकडून करण्यात आले आहे.

पिंपरी चिंचवड महापालिकेने आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंहअतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच कर संकलन व कर आकारणी विभागाचे सहाय्यक आयुक्त अविनाश शिंदे यांच्या अधिपत्याखाली आर्थिक वर्ष २०२५-२६ चा मालमत्ता कर वसूल करण्यासाठी १ एप्रिल २०२५ पासून व्यापक मोहीम हाती घेतली आहे. ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत मालमत्ता कर भरणाऱ्या मालमत्ताधारकांना सामान्य करावर ४ टक्के सवलत देण्यात येत आहे. नागरिकांना कर सवलतीची माहिती देण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने थेट संपर्क साधला जात आहे. कर संकलन विभागाच्या १८ विभागीय कार्यालयांमार्फत लिपिकगटलिपिकसहायक मंडलाधिकारी आणि इतर एकूण २० कर्मचाऱ्यांची टीम टेलिकॉलिंगच्या माध्यमातून थेट नागरिकांशी संवाद साधत आहे. या संवादातून नागरिकांना मालमत्ता कर सवलतीची माहिती दिली जात असूनवेळेत कर भरण्याचे आवाहन केले जात आहे. त्यातच आता सामान्य करावर देण्यात आलेली ४ टक्के सवलतची मुदत संपण्यासाठी अवघा एक दिवस बाकी आहे. तरी नागरिकांनी आपला चालू आर्थिक वर्षातील तसेच थकीत कर भरून या सवलतींचा लाभ घ्यावाअसे आवाहन करण्यात येत आहे.

मालमत्ता कर ३० सप्टेंबर २०२५ पूर्वी भरणाऱ्यांना सामान्य करावर देण्यात आलेल्या ४ टक्के सवलतीचा लाभ जास्तीत जास्त मालमत्ताधारकांना मिळावायासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागाकडून व्यापक जनजागृती करण्यात येत आहे. नागरिक देखील या योजनेला चांगला प्रतिसाद देत आहे. अद्यापही या सवलतीचा लाभ घेण्यासाठी एक दिवसांची मुदत बाकी असून जास्तीत जास्त मालमत्ताधारकांनी या सवलतींचा लाभ घेऊन भविष्यात होणारी कारवाई टाळावी.

– प्रदीप जांभळे पाटीलअतिरिक्त आयुक्तपिंपरी चिंचवड महापालिका

कर आकारणी व कर संकलन विभागाने कर संकलनासाठी नागरिकांशी थेट संवाद वाढवला आहे. टेलिकॉलिंगमेसेजनोटिसा आणि जनजागृती मोहिमेतून नागरिकांना वेळेत कर भरण्याचे आवाहन केले जात आहे. मालमत्ता कर हा फक्त महसूल नसून शहराच्या विकासातील तुमचा थेट सहभाग आहे. रस्तेउद्यानेपाणीपुरवठाआरोग्य सुविधा या सर्वांसाठी कराचा वापर केला जातो. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने कर भरण्यात पुढाकार घ्यावा.

– अविनाश शिंदेसहायक आयुक्तपिंपरी चिंचवड महापालिका

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!