spot_img
spot_img
spot_img

औंध मध्ये ‘स्पर्धा परीक्षा विभागाला पुस्तक भेट व मार्गदर्शन व्याख्यान’ संपन्न

शबनम न्यूज | प्रतिनिधी

रयत शिक्षण संस्थेच्या, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात प्रबोधन प्रतिष्ठान, स्पर्धा परीक्षा विभाग, पोलिस मिल्ट्री पूर्व परीक्षा विभाग आणि IBPS विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ‘स्पर्धा परीक्षा विभागाला पुस्तक भेट व मार्गदर्शन व्याख्यान’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मा. राहुल खंदारे – संचालक, UPSC अॅकॅडमी, पुणे; मा.अविनाश गायकवाड- सी. ए. देहू रोड पुणे हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे मा. प्राचार्य डॉ. अरुण आंधळे यांनी भूषविले.

मा.अविनाश गायकवाड विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले, आपले गुरुवर्य आणि आपले आयडॉल आपले आयुष्य घडवितात. स्पर्धा आयुष्यात खूप आहेत. ग्रॅज्युएशन हे फक्त फाउंडेशन आहे. आजच्या स्पर्धेच्या युगात तुम्हाला अग्रसेन व्हायचंय. त्यासाठी अभ्यास करणं आवश्यक आहे. यासाठी त्यांनी मा. विश्वास नांगरे पाटील यांची गोष्ट सांगून विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली. आयुष्य घडविण्यासाठी शिक्षक ही गुरुकिल्ली आहे. असे ते म्हणाले.

मा. राहुल खंदारे विद्यार्थ्यांनशी संवाद साधतान म्हणाले, तुमच्या संस्थेचे ध्येय वाक्य रोज तुम्ही चार-पाच वेळा म्हणलात तर तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत सहज पोहचाल. तुम्ही जनरेशन झेन चे विद्यार्थी. तुमची पिढी मल्टीटास्किंगची आहे. तुम्ही जनरेशनचे कॅरेक्टर ओळखा, त्याला आमच्या अनुभवाची जोड द्या, टेक्नॉलॉजीचा सपोर्ट घ्या. आणि अभ्यासात स्मार्ट बना. सायन्स, भूगोल आणि अर्थशास्त्र हे विषय परफेक्ट करा. त्याच बरोबर गणित आणि बुध्दीमापन याच्याही अभ्यासाची जोड द्या.

मान्यवरांनी महाविद्यालयातील स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राला पुस्तकांची भेट दिली.
महाविद्यालयाचे प्राचार्य, मा. डॉ. अरुण आंधळे आपल्या अध्यक्षीय मनोगतात म्हणाले, विद्यार्थ्यांनी स्वप्न बघायला शिका. त्यावर विचार करा आणि ते प्रत्यक्ष कृतीत उतरवण्यासाठी प्रयत्न करा. तुम्ही एकाग्र चित्त करण्याची गरज आहे. तुमची जागा तुम्हाला निर्माण करायची आहे. तुम्ही तुमची जिज्ञासा जागृत ठेवली पाहिजे.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय प्रबोधन प्रतिष्ठानचे मा. गोरख ब्राहमणे यांनी करून दिला. कार्यक्रमाचे आभार प्रा. डॉ. संदीप नन्नावरे यांनी मानले. तर सूत्रसंचालन प्रा. डॉ. वैशाली सुपेकर यांनी केले. यावेळी बहुसंख्येने विद्यार्थी उपस्थित होते.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!