spot_img
spot_img
spot_img

सिंबायोसिस सेंटर फॉर डिस्टन्स लर्निंग (SCDL) मध्ये सरस्वती पूजन उत्साहात संपन्न

शबनम न्यूज | प्रतिनिधी

सिंबायोसिस सेंटर फॉर डिस्टन्स लर्निंग (SCDL), मॉडेल कॉलनी येथे नवरात्री निमित्त सरस्वती पूजन मोठ्या उत्साहात पार पडले. सिंबायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी (एसएसपीयू) चे कुलपती डॉ. एस.बी. मुजुमदार आणि प्र-कुलपती डॉ. स्वाती मुजुमदार यांच्या हस्ते सरस्वती मातेचे पूजन मोठ्या भक्ती भावाने करण्यात आले. दरवर्षीप्रमाणे यंदाही साईबाबांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

या वेळी संजीवनी मुजुमदार, मेंबर, सिंबायोसिस ओपन एजुकेशन सोसाइटी; डॉ. विद्या येरवडेकर, प्रधान संचालक, प्रो चांसलर, सिंबायोसिस इंटरनॅशनल; सोनाली कदम, उपसंचालक, एससीडीएल; आशिष निमगिरे, रजिस्ट्रार, एसओईएस; शरद पुलाटे, रजिस्ट्रार, एसएसपीयू;  मनीष भारद्वाज,सैन्य आणि संरक्षण संशोधन आणि विकास संघटना (DRDO); ग्रॅव्हिटस फाउंडेशनच्या उषा काकडे तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते. त्याच बरोबर सिंबायोसिस ओपन एजुकेशन सोसाइटी मधील प्राध्यापक, शिक्षक आणि शिक्षेकेतर कर्मचारी यांचा सहभाग उल्लेखनीय होता.

या दिवशी सिंबायोसिस स्किल्स युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थिनींनी देवी स्तोत्र पठण व नृत्य सादरीकरण केले.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!