शबनम न्यूज | प्रतिनिधी
भारतीय हवामान विभागाकडून (IMD) प्राप्त झालेल्या पूर्वामानानुसार मध्य महाराष्ट्र, कोकण आणि विदर्भात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. राज्यात २७ ते २९ सप्टेंबर २०२५ या कालावधीमध्ये ऑरेज आणि रेड अर्लट असलेल्या जिल्ह्यांना खबरदारी व पूर्वतयारीची कार्यवाही तातडीने राबविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत असे राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून कळविण्यात आले आहे.
मध्य महाराष्ट्र आणि कोकणात २७ ते २९ सप्टेंबरदरम्यान काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे असून २८ सप्टेंबर रोजी काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
विदर्भात दि. २७ सप्टेंबर रोजी अनेक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
मराठवाड्यात २६ ते २९ सप्टेंबर दरम्यान अनेक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. २७ आणि २८ सप्टेंबर रोजी काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
नागरिकांना आवाहन :
- नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. अधिकृत सूचनांचे पालन करावे.
- धोकादायक भागात जाणे टाळावे.
- पूर प्रवण क्षेत्रात जाणे टाळावे.
- वीज पडत असताना झाडाखाली थांबणे टाळावे.
- पुरापासुन बचावासाठी अत्यावश्यक सर्व बाबींची काळजी घ्यावी.
- पुराच्या आपत्तीपासुन वाचण्यासाठी स्थानिक निवारा केंद्राचे सहाय्य घ्यावे.
- पूर परिस्थितीत अनावश्यक पर्यटन टाळावे.
- पूर परिस्थितीत नदी नाल्यांच्या पुलावरुन पाणी जात असताना, रस्ता ओलांडू नये आणि अफवांवर विश्वास ठेवू नये.