भक्ती कुरकुटे यांची एक आदर्श व्यक्तिमत्व म्हणून ओळख
शबनम न्यूज , प्रतिनिधी : पिंपरी चिंचवड शहरातील सामाजिक कार्यकर्त्या भक्ती महावीर कुरकुटे यांच्या माध्यमातून नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने नवदुर्गांचा सन्मान अभियान राबविण्यात येत आहे. यामध्ये आतापर्यंत 55 नवदुर्गांचा सन्मान भक्ती कुरकुटे यांनी केला आहे.
आरोग्य सेवा पुरविण्याचे काम आरोग्य सेविकांकडून होत असते या आरोग्य सेविकांचा सन्मान भक्ती कुरकुटे यांनी केला, जीवनरेखा हॉस्पिटल व आधार हॉस्पिटल येथील आरोग्य सेविकांचा सन्मान भक्ती कुरकुटे यांच्या हस्ते करण्यात आला.
तसेच आपल्या संरक्षणासाठी सेवेत असणाऱ्या महिला पोलिसांचा सन्मान भक्ती कुरकुटे यांनी या नवदुर्गा सन्मान अभियाना अंतर्गत केले, यामध्ये रावेत पोलीस स्टेशन व देहूरोड पोलीस स्टेशन येथील महिला पोलीस अधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला.
सामाजिक कार्यकर्त्या भक्ती महावीर कुरकुटे यांनी आज पर्यंत अनेक सामाजिक कामात सहभाग घेतला आहे. मागील काही दिवसापूर्वी वायसीएम रुग्णालयात एका कॅन्सर रुग्णाला त्यांनी मदतीचा हात दिला. तसेच पिंपरी चिंचवड शहरातील अनेक महिलांच्या समस्यांचे निराकरण करण्याचा त्यांनी ध्यास धरला आहे. त्यानुसार पीडित व अडचणीत असलेल्या समाजातील महिलांसाठी भक्ती महावीर कुरकुटे या कार्य करीत आहेत. पीडित महिलांना न्याय मिळवून देणे, अडचणीत आलेल्या समाजातील महिलांना त्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी, त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी पुढाकार घेत आहेत भक्ती महावीर कुरकुटे यांची या कार्यामुळे एक आदर्श व्यक्तिमत्व म्हणून ओळख निर्माण होत आहे.