spot_img
spot_img
spot_img

फातिमाबी शेख यांचा पुतळा उभारावा; मारुती भापकर यांची मागणी

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने क्रांतीज्योती महात्मा ज्योतिराव फुले व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकाच्या जागेत सुयोग्य ठिकाणी फातिमाबी शेख यांचा पुतळा, व फुले सृष्टी फातिमा बी व क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे तसेच भिडे वाड्या यांच्या जीवनावरील म्युरल्स बसविण्यात यावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांच्याकडे केले आहे त्यांनी याबाबत आपले निवेदन देताना त्यात नमूद केले आहे की,
क्रांतीज्योती महात्मा ज्योतिराव फुले व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांनी या देशात सर्वप्रथम शिक्षणाचे महत्त्व ओळखून ऐतिहासिक कार्य केले. मुलींची पहिली शाळा पुणे येथील भिडे वाडा येथे सुरू केली. हे कार्य करत असताना या महामानवांना खूप यातना, दुःख, रोष सहन करावा लागला.
क्रांतीज्योती महात्मा ज्योतिराव फुले व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाचे ऐतहासिक महान कार्य सुरु केले त्यावेळी क्रांतीवीर लहुजी वस्ताद साळवे यांनी या कार्याला संपुर्ण पांठीबा देवुन सहकार्य केले. तसेच भिडे कुंटुंबियांनी या कार्यासाठी पुण्यातील ऐतहासिक भिडेवाडा दिला.
तसेच ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या फातिमाबी शेख या केवळ सहकारी मैत्रीण नव्हत्या तर सावित्रीबाईंच्या खांद्याला खांदा लावून वंचित व उपेक्षितांच्या शिक्षणासाठी योगदान देणा-या प्रबोधक होत्या. स्त्रियांना शिक्षण देण्यासाठी ज्ञानज्योती सावित्रीबाईंना जो अपमान अवहेलना सहन करावा लागला. जसे अंगावर दगड, चिखल,शेण सावित्रीबाईंच्या अंगावर फेकले तेच फातीमाबी शेख यांनाही सहन करावे लागले असणार.
त्यामुळे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने पिंपरी येथील क्रांतीज्योती महात्मा ज्योतिराव फुले व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकाच्या जागेत सुयोग्य ठिकाणी फातिमाबी शेख यांचा पुतळा व फुले सृष्टीत फातिमाबी, क्रांतीवीर लहुजी वस्ताद साळवे व भिडेवाड्याचे यांच्या जीवनावरील म्युरल्स बसवण्यात यावे. ही विनंती.
या कामासाठी ऐतहासिक पुरावे दस्त, पुस्तके आपल्याकडे आम्ही देत आहोत त्याचा सारासार विचार करुन या विषयासंदर्भातील तज्ञांशी, इतिहासकारांशी चर्चा करुन योग्य ते तातडीने निर्णय व्हावेत.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!