spot_img
spot_img
spot_img

‘व्हिजन@५०’ उपक्रमांतर्गत आयोजित कार्यशाळेत शिक्षण क्षेत्रातील विविध विषयांवर झाले विचारमंथन

शबनम न्यूज | प्रतिनिधी

पिंपरी चिंचवड महापालिका स्थापनेस २०३२ मध्ये ५० वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने महापालिकेने व्हिजन@५० शहर धोरण‘ हा उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमांतर्गत शिक्षण विभागासाठी पुढील पाच वर्षांचा धोरणात्मक आराखडा तयार करण्याच्या अनुषंगाने विचारमंथन करण्यासाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेमध्ये महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांनी देखील सहभागी होऊन आपले मत मांडले.

 

पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या संकल्पनेतून व्हिजन@५० शहर धोरण‘ हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या अंतर्गत विविध क्षेत्रातील व्यक्तींशी चर्चा करण्यात येत आहे. शहराचा विकास करताना प्राधान्यक्रम कोणत्या गोष्टींना द्यावाकोणत्या क्षेत्रांना महत्त्व द्यावेयेथील शिक्षण व्यवस्था कशी असावीपर्यावरण उत्तम राहावे यासाठी काय उपाययोजना कराव्यातअशा विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी या उपक्रमांतर्गत वेगवेगळ्या क्षेत्रातील व्यक्तींच्या कार्यशाळा आयोजित केल्या जात आहेत. त्याच अनुषंगाने आज महापालिका आयुक्त शेखर सिंहअतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेला सहाय्यक आयुक्त किरणकुमार मोरेप्रशासन अधिकारी संगीता बांगरप्रथम या संस्थेच्या सह संस्थापक रजिया फरीदा यांच्यासह आकांक्षा फाउंडेशनसत्त्वा कन्सल्टिंगसंगातकिंडर स्पोर्ट्सक्वालिटी कौन्सिल ऑफ इंडियालीडरशिप इक्विटीपाय जाम फाउंडेशनटीच फॉर इंडियालेंड अँड हँडयुनिसेफ अशा विविध संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

 

या कार्यशाळेत पिंपरी-चिंचवड शहरातील शिक्षण क्षेत्राचा सविस्तर आढावा घेऊनविद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीचे डेटा-आधारित विश्लेषणशालेय बाह्य मुलेशाळांमध्ये राबविलेल्या सर्वोत्तम पद्धतींचे सादरीकरण आणि राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय शिक्षण व्यवस्थेतील यशस्वी पद्धतीशिक्षण विभागासाठी प्राधान्यक्रम निश्चित करणेया क्षेत्रातील नवीन आव्हाने यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. विशेष म्हणजेमहापालिकेतील पाच विद्यार्थ्यांनी या कार्यशाळेत सहभागी होऊन त्यांच्या शालेय जीवनातील अनुभव आणि भविष्यात शाळांमध्ये पाहायला आवडणारे बदल याबाबत मते व्यक्त केली. डिजिटल साधनांचा वापर वाढवणेशिक्षक-विद्यार्थी संवाद अधिक प्रभावी करणेक्रीडा व सर्जनशील उपक्रमांना अधिक महत्त्व देणेआणि मानसिक आरोग्यावर लक्ष केंद्रित करण्याची आवश्यकता यांसारख्या मुद्द्यांवर विद्यार्थ्यांनी भर दिला.

 

कार्यशाळेतून आलेल्या सूचनांच्या आधारे शिक्षण विभागासाठी सर्वसमावेशकविद्यार्थी-केंद्रित आणि दूरदर्शी धोरणात्मक आराखडा तयार केला जाणार असूनयामुळे पुढील पाच वर्षांत पिंपरी-चिंचवड शहरातील शिक्षण क्षेत्रात एक आदर्श उभा राहीलअसा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

पिंपरी चिंचवड शहरातील प्रत्येक विद्यार्थ्याला गुणवत्तापूर्णसमावेशक शिक्षण मिळावेहा आमचा मुख्य उद्देश आहे. या धोरणात्मक आराखड्याद्वारे आम्ही फक्त शाळा सुधारत नाहीतर संपूर्ण शिक्षण संस्कृतीत बदल घडवून आणण्याचा प्रयत्न करत आहोत. विद्यार्थ्यांच्या गरजाशिक्षकांचे योगदान आणि समाजाची अपेक्षा लक्षात घेऊन तयार होणारा हा आराखडा पुढील पाच वर्षांत शहराच्या शिक्षण क्षेत्राला नवी दिशा देईल.

– शेखर सिंहआयुक्त तथा प्रशासकपिंपरी चिंचवड महापालिका

शिक्षण हे केवळ शाळेतल्या ज्ञानपुरवठ्यापुरते मर्यादित नसून तो प्रत्येक विद्यार्थ्याच्या व्यक्तिमत्त्व विकासाचा आणि समाजात त्याच्या योगदानाचा पाया आहे. ही कार्यशाळा विविध भागधारकांचे अनुभवडेटा विश्लेषणविद्यार्थ्यांचा सहभाग आणि तज्ज्ञांचे मार्गदर्शन एकत्र आणून धोरणात्मक आराखड्याला अधिक परिणामकारक आणि समावेशक बनवेल.

 – प्रदीप जांभळे पाटीलअतिरिक्त आयुक्तपिंपरी चिंचवड महापालिका 

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देणे हे आमचे प्राधान्य आहे. या आराखड्याद्वारे डिजिटल साधनांचा वापरशिक्षक प्रशिक्षणशाळेतील पायाभूत सुविधा सुधारणा आणि विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला व मानसिक आरोग्याला महत्त्व देण्यात येईल. यामुळे सर्व विद्यार्थ्यांना समान संधी मिळेल आणि शहरातील शिक्षण क्षेत्रात आदर्श निर्माण करू शकतो.

– किरणकुमार मोरेसहाय्यक आयुक्तपिंपरी चिंचवड महापालिका

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!