spot_img
spot_img
spot_img

एस. बी. पाटील पब्लिक स्कूल ला “उडान ३” राज्यस्तरीय नृत्य स्पर्धेत प्रथम क्रमांक सह अनेक पारितोषिके

शबनम न्यूज | प्रतिनिधी

पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट संचालित रावेत येथील एस. बी. पाटील पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी पिंपरी येथील आचार्य अत्रे रंगमंदिर मध्ये केलेल्या डान्स विथ म्युझिक यांच्या वतीने आयोजित केलेल्या “उडान 3” या राज्यस्तरीय नृत्य स्पर्धेत प्रथम क्रमांक सह अनेक पारितोषिके पटकावली आहेत.
या स्पर्धेत महाराष्ट्रातून चाळीसपेक्षा जास्त शाळांमधील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.
यावेळी पीसीइटीच्या प्राचार्या डॉ. बिंदू सैनी, उपप्राचार्या पद्मावती बंडा, एस.बी.पाटील पब्लिक स्कूलच्या मुख्याध्यापिका शुभांगी कुलकर्णी आदी उपस्थित होते.
एस.बी.पाटील पब्लिक स्कूल, रावेतच्या विद्यार्थ्यांमध्ये इयत्ता चौथी ते सहावी लोककला शैली प्रथम पारितोषिक पटकावले. तर इयत्ता चौथी ते सहावी खुल्या शैलीत द्वितीय पारितोषिक प्राप्त केले. तसेच इयत्ता सातवी ते दहावी शास्त्रीय नृत्यात द्वितीय पारितोषिक मिळाले. कला शिक्षक अजय चावरिया यांना
सर्वोत्कृष्ट नृत्यदिग्दर्शक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
नृत्य स्पर्धेत विद्यार्थ्यांना मिळालेले यश हे सर्जनशीलता, नृत्यकलेचा सन्मान असल्याचे प्राचार्या डॉ. बिंदू सैनी यांनी सांगितले. तसेच त्यांनी विजेत्यांचे अभिनंदन केले.
पीसीइटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त तथा पीसीयूचे कुलपती हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक केले

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!