spot_img
spot_img
spot_img

फुले नगर सह शहरातील समस्या सोडविण्याची अजित दादांची ग्वाही

‘राष्ट्रवादी परिवार मिलन’ कार्यक्रमात फुले नगर येथे नागरिकांशी साधला संवाद

शबनम न्यूज | प्रतिनिधी

फुले नगर येथील विद्युत पुरवठा वारंवार खंडित होतो तसेच येथे नागरी सुविधा बाबत राष्ट्रवादी काँग्रेस असंघटित विभागाचे शहराध्यक्ष रवींद्र ओव्हाळ यांनी दिलेल्या निवेदनातील सर्व समस्या सोडविण्याचे काम मी आणि माझी टीम करेल अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
   रविवारी ‘राष्ट्रवादी परिवार मिलन’ कार्यक्रमात अजित पवार यांनी फुले नगर येथे नागरिकांशी संवाद साधला. यावेळी विधानसभा उपाध्यक्ष आण्णा बनसोडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष योगेश बहल, राष्ट्रवादी काँग्रेस असंघटित विभागाचे शहराध्यक्ष रवींद्र ओव्हाळ, रवि काची,  सादिक खान, जफर शेख, अशोक भडकुंबे, सुनिल गवांदे, अमोल मिसाळ, चंदू हलगी,  चंद्रकांत बच्चे पाटील,  मिनाक्षी ओव्हाळ, लक्ष्मी फुलारी,  संगीता भारती, दीपा मुरकुटे, प्रतिभा वानखडे, संगीता खरात, पल्लवी कांबळे, दीपक साकोरे, माऊली मोरे, मल्लिकार्जुन फुलारे, हारून मुजावर, सुनील अडगळे, महादेव अडागळे आदींसह परिसरातील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.
    यावेळी महिला भगिनींनी अजित पवार यांचे औक्षण केले. रवींद्र ओव्हाळ यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. 
    यावेळी अजित पवार म्हणाले की, पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांनी मला २५ वर्ष साथ दिली. त्यामुळे मी या शहराचा विकास करू शकलो. देशातील अग्रगण्य शहर म्हणून पिंपरी चिंचवड शहर ओळखले जावे यासाठी आणखी अनेक कामे करायची आहेत. त्यासाठी पुन्हा एकदा मला साथ द्यावी. मी माझ्या सर्व टीमला सोबत घेऊन पिंपरी चिंचवड शहरातील झोपडपट्टीतील नागरिकांना चांगली घरे देणे, नियमित वीज पुरवठा देण्याची व्यवस्था करणे, मेट्रो चा विस्तार करणे, शहरातील सर्व भागासह झोपडपट्टीतील घरांनाही नियमित शुद्ध पाणी पुरवठा, रिंग रोड पूर्ण करणे, कायदा सुव्यवस्था सुरळीत ठेवणे असे सर्व प्रश्न सोडविण्याची ग्वाही देतो. त्यासाठी पुढील काळात मला साथ द्या असे आवाहन अजित पवार यांनी उपस्थितांना केले. यावेळी युवकांनी अजित पवार आगे बढो हम तुम्हारे साथ है अशा घोषणा दिल्या. विधानसभा उपाध्यक्ष आण्णा बनसोडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष योगेश बहल यांनीही सर्व प्रश्न अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली सोडवू असे सांगितले.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!