spot_img
spot_img
spot_img

संजय जगताप यांनी अजित पवार यांच्यासमोर वाचला प्रभाग क्र. 14 मधील समस्यांचा पाढा

अजित पवार यांनी दिले समस्या सोडविण्याचे आदेश

शबनम न्यूज | प्रतिनिधी

राष्ट्रवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जनसंवाद सभा घेऊन पिंपरी चिंचवड शहरातील अनेक समस्या जाणून घेतल्या व त्यांचे निराकरण केले. त्यांच्या या जनसंवाद कार्यक्रमात एकूण 4 हजार 800 प्रकरणांची नोंद झाली आहे तर अजित पवार यांनी जागेवरच 1 हजार 800 प्रकरण मार्गी लावले. यामध्ये प्रामुख्याने मोहन नगर परिसरातील प्रभाग क्रमांक 14 मधील नागरिकांच्या विविध समस्या राष्ट्रवादी पक्षाचे सरचिटणीस संजय जगताप यांनी अजित पवार यांच्यासमोर मांडल्या. यामध्ये

१. मोहननगर, रामनगर, काळभोर नगर येथे गेल्या २ वर्षापासून रोज दिवसातुन कमीत कमी ३ ते ४ वेळा लाईट जाते, त्या संदर्भात आम्ही सातत्याने संबंधित अधिकाऱ्यांना समक्ष भेटून / फोन करून अडचणी सांगत असतो, तसेच गेल्यावर्षी महावितरणाच्या विरोधात थरमॅक्स चौक येथील महावितरणच्या कार्यालयावर सर्वपक्षीय धडक मोर्चा काढून आंदोलन केले होते तरी सुद्धा आजपर्यंत हा प्रश्न सुटलेला नाही, तरी तो आपण मार्गी लावावा, हि विनंती.

२. मोहननगर मधील गाय वासरू चौकातील दगडी पेव्हींग ब्लॉक काढून त्यावर त्वरित डांबरीकरण करावे. कारण, रोज या चौकामध्ये दुचाकीस्वार, सायकलस्वार यांचे अपघात होत असुन जेष्ठ नागरिकांना सुद्धा त्यावरून चालण्यास खूप त्रास होत असुन बरेच जेष्ठ नागरिक / महिला भगिनी /विधार्थी पाय घसरून पडलेले आहेत.

३. मोहननगर मधील श्री शिवछत्रपती स्वागत कमान ते गाय वासरू चौक आणि गाय वासरू चौक ते मेहता हॉस्पिटल चौक या रस्त्याच्या कडेने असलेले फुटपाथची रुंदी कमी करून रस्ता रुंद करण्यात यावा, कारण त्या फुटपाथ मुळे रस्ता कमी झाल्याने वाहतुकीत मोठा अडथळा निर्माण होत आहे, तसेच त्यावरती नागरिकांनी दुचाकी व चारचाकी वाहने पार्किंग करून अतिक्रमण केल्यामुळे नागरिकांना फुटपाथ वर चालता येत नाही.

४. मोहननगर मधील शिवदर्शन कॉलनी येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अर्ध पुतळ्या वरील शिंदेशाही पगडी काढून शिवाजी महाराजांच्या डोक्यावर जिरेटोप बसविण्यात यावा.

५. मोहननगर येथील सर्व्हे नं. १३५ मधील नागरिकांची १९८० सालांपासून स्वतःची बांधलेली घरे असून एम.आय.डी.सी. च्या रिजर्वेशनमुळे त्यांच्या हक्कांच्या घराचे आजपर्यंत खरेदीखते होऊ शकली नाहीत. तरी आपण या प्रश्नामध्ये स्वतः लक्ष देऊन सदर नागरिकांना खरेदीखते करून देण्यात यावीत यासाठी मदत करावी.

या सर्व समस्या ऐकून घेऊन अजित पवार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना या समस्यांचे निराकरण करण्याचे आदेश दिले.

मोहन नगर परिसरातील रहिवाशांचे समस्यांची चांगलीच जाण संजय जगताप यांना आहे. अनेक वर्षापासून ते राष्ट्रवादी पक्षाच्या माध्यमातून तसेच विविध सामाजिक संघटनांच्या माध्यमातून सामाजिक कार्य करत आले आहेत. नागरिकांच्या समस्या त्यांनी जवळून पाहिले आहेत आणि या समस्या सोडविणे आवश्यक असल्याने त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जनसंवाद सभेत जणू नागरिकांच्या समस्यांचा पाढाच वाचला आहे आणि या समस्यांचे निराकरण करण्याचे अजित पवार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना आदेश दिल्याने संजय जगताप यांच्या प्रयत्नांना नक्कीच यश आले आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!