-
एकता प्रतिष्ठानच्या नवरात्र महोत्सव समितीचे अध्यक्षपदी नंदिनी घारे, उपाध्यक्षपदी कार्तिकी काळभोर
-
नवरात्र उत्सवाची कार्यकारिणी केली जाहीर!
शबनम न्यूज | प्रतिनिधी
मावळ डोणे गावातील ग्रामदैवत श्री डोणु आई शारदीय नवरात्र उत्सवासाठी एकता प्रतिष्ठान डोणे व एकता महिला मंच डोणे या दोन्ही ट्रस्ट सज्ज झाले आहेत.
दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मोठ्या उत्साहात नवरात्र उत्सव डोणे गावात साजरा होत आहे. या नवरात्र उत्सवा करिता एकता प्रतिष्ठान व एकता महिला मंच वतीने श्री डोणू आई देवी नवरात्र महोत्सव 2025 करिता महिला कार्यकारणी जाहीर करण्यात आली आहे.
एकता प्रतिष्ठानचे संस्थापक बाळासाहेब घारे पाटील यांच्या मार्गदर्शनाने सदर कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून, या कार्यकारणी मध्ये नंदिनी छबु घारे यांना अध्यक्ष पद देण्यात आले आहे तर उपाध्यक्षपदी कार्तिकी किरण काळभोर यांची निवड करण्यात आली आहे. याचबरोबर कार्याध्यक्ष तनुजा चांदेकर, सचिव कार्तिकी खिलारी, सहसचिव स्नेहल संतोष लांडगे, खजिनदार पायल घारे, सह खजिनदार सानिका घारे ,सदस्या तृप्ती घारे ,जिया घारे, अक्षदा घारे, सानिया कारके, सेजल कारके, नेहा चंदू चांदेकर, नंदिनी खराडे, साक्षी घारे ,पायल घारे, नेहा कारके यांची कार्यकारणी म्हणून वर्णी लागली आहे.
या कार्यकारणी निवडीच्या वेळी एकता प्रतिष्ठानचे संस्थापक बाळासाहेब घारे पाटील, उपाध्यक्ष रवींद्र काळभोर, सचिव मल्हारी खिल्लारी, ग्रामपंचायत सदस्य समीर खिल्लारी, खजिनदार विश्वास चांदेकर, सोमनाथ खिल्लारी, कैलास घारे व पोलीस पाटील उमेश घारे, सागर चांदेकर, आदी मान्यवर उपस्थित होते. यावर्षीच्या नवरात्र उत्सवानिमित्त येणाऱ्या भाविकांसाठी विविध सामाजिक व धार्मिक उपक्रम राबविले जाणार आहेत, या सर्व नवरात्र उत्सवाची जबाबदारी निवड केलेल्या कार्यकारणीवर असणार आहे.