spot_img
spot_img
spot_img

पत्रकार व कुटुंबीयांसाठी आयोजित मोफत संपूर्ण आरोग्य तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

शबनम न्यूज | प्रतिनिधी

पिंपरी चिंचवड मराठी पत्रकार संघ व स्वर्गीय दत्तोपंत म्हसकर सार्वजनिक विश्वस्त संस्था यांच्या वतीने निगडी प्राधिकरणात पत्रकार व कुटुंबीयांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.त्यास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

शिबिराचे उद्घाटन पत्रकार संघाचे अध्यक्ष नंदकुमार सातुर्डेकर व महापारेषणचे अधिकारी श्रीराम देशमुख यांच्या हस्ते झाले. यावेळी स्व दत्तोपंत म्हसकर सार्वजनिक विश्वस्त संस्थेचे अध्यक्ष प्रदीप पवार, सचिव मिलिंदराव कुलकर्णी, सदस्य नरेंद्र पेंडसे, पिंपरी चिंचवड मराठी पत्रकार संघाचे सरचिटणीस अविनाश चिलेकर, खजिनदार विवेक इनामदार, महापारेषणचे अभिजीत कानडे, डी वाय पाटील आयुर्वेद रुग्णालयाच्या जनसंपर्क अधिकारी भारती मराठे उपस्थित होते.

स्वर्गीय दत्तोपंत म्हसकर सार्वजनिक विश्वस्त संस्था सेक्टर नंबर 27 प्राधिकरण, काड सिद्धेश्वर मठाशेजारी आयोजित या शिबिरात जपानी टेक्नॉलॉजी मशीनच्या साह्याने फुल बॉडी चेकअप ( संपूर्ण शारीरिक तपासणी) करण्यात आली. डॉ महेंद्र पाटील,डॉ. आकाश पुरी, डी वाय पाटील आयुर्वेद महाविद्यालय रुग्णालयाची टीम यांनी ही तपासणी केली.

मधुमेह,ट्युमर, गुडघेदुखी, हाडांचे फ्रॅक्चर, रक्तदाब,डोळ्यांचे आजार, अल्सर,कॅन्सर,विस्मरण, श्वसनाचे विकार,सोरायसिस, त्वचा विकार, दंतविकार,यूरिन इन्फेक्शन,पोटाचे त्रास,मुतखडा, याबाबतच्या तपासण्या करण्यात आल्या. संपूर्ण शरीर तपासणी बरोबरच आयुर्वेदिक चाचण्या,दंत तपासणी,डोळे तपासणी करण्यात आली . तसेच यावेळी वैद्यकीय साहित्य केंद्राचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी बोलताना नरेंद्र पेंडसे म्हणाले की, वैद्यकीय सेवा हे सर्वात मोठे पुण्याचे काम आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काही काम करत नाही. मात्र संघाचे स्वयंसेवक कोणतेही काम करायचे शिल्लक ठेवत नाहीत. असे ते म्हणाले. संघ प्रेरणेतून दत्तोपंत म्हसकर सार्वजनिक विश्वस्त संस्था कार्यरत असल्याचे सचिव मिलिंदराव कुलकर्णी म्हणाले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. भाग्यश्री अत्रे जोशी यांनी केले तर किरण कुलकर्णी यांनी आभार मानले.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!