डॉ. राजीव घोडे यांनी सांगितले की, महोत्सवाचे उद्घाटन शनिवारी (ता. २७) सकाळी ११ वाजता होणार आहे. अश्वारूढ छत्रपती शिवाजी महाराजांची शाही मिरवणूक, शिवकालीन शस्त्रात्रांचे प्रात्यक्षिक व ऐतिहासिक मर्दानी खेळांचे सादरीकरण करत महोत्सवाला सुरुवात होईल. ‘पानशेतमधील महोत्सवाचे सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक परिणाम’ यावर चर्चा होणार आहे. दुपारच्या सत्रात ‘पानशेतमधील निसर्ग, इतिहास आणि पर्यटनातील रोजगाराच्या संधी’ या विषयावर परिसंवाद होईल. दुपारी ३ ते सायंकाळी ६ या वेळेत लघुपटांचे स्क्रिनींग होईल. संगीत मैफलीने पहिल्या दिवसाच्या कार्यक्रमाची सांगता होईल.
दुसऱ्या दिवशी सकाळी ९ ते १० या वेळेत स्थानिक पर्यटन, रिसॉर्ट मालक, टूर्स अँड ट्रॅव्हल्स यांचा मेळावा होणार आहे. सकाळी १० ते १२ या वेळेत निवडक लघुपटाचे स्क्रीनिंग होणार आहे. दुपारी १२ वाजता ‘महाराष्ट्रातील पर्यटनस्थळे व चित्रपटाचे चित्रीकरण’ या विषयावर परिसंवाद होणार आहे. यामध्ये दिग्दर्शक, पत्रकार, पर्यटन व विपणन क्षेत्रातील तज्ज्ञ व अधिकारी सहभागी होणार आहेत. ‘पानशेतमधील निसर्ग, इतिहास, भूगोल आणि पर्यटनातील उलगडा’ यावर श्रमिक गोजमगुंडे आणि महेश धिंडले यांची प्रकट मुलाखत होणार आहे. दुपारी ३ ते ५ दरम्यान मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार समारंभ पार पडणार आहे, असे असीम त्रिभुवन म्हणाले.
पर्यटन क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल यंदाचा जीवनगौरव पुरस्कार २०२५ वीणा गोखले, बेस्ट टूर्स अँड ट्रॅव्हल्स अवॉर्ड’ अमित कुलकर्णी (गेट सेट गो हॉलिडेज) यांना प्रदान प्रदान करण्यात येणार आहे. यासह सर्वोत्कृष्ट लघुपट व सर्वोत्कृष्ट असे विविध पुरस्कार देण्यात येणार आहेत. लघुपट महोत्सवाचे परीक्षक म्हणून अभिनेत्री वैशाली केंदळे, परीक्षक डॉ. संतोष पठारे आणि अक्षय इंडिकर यांनी काम पाहिले आहे, असे जीवराज चोले यांनी नमूद केले.