spot_img
spot_img
spot_img

महापालिकेच्या भोसरी येथील इंद्रायणीनगर शाळेत आरोग्य तपासणी शिबीर

५५८ विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी शिबीर, सर्व मुलांचे अहवाल निरोगी

पिंपरी २० सप्टेंबर २०२५ – आज पिंपरी -चिंचवड महानगपालिकेच्या इंद्रायणीनगर प्राथमिक शाळा, भोसरी येथे प्राथमिक आरोग्य तपासणी कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला. या कार्यक्रमांतर्गत इयत्ता पहिली ते सातवी मधील ५५८ विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली.विद्यार्थ्यांची कुष्ठरोग तपासणी वाय सी एम. हॉस्पिटल, पिंपरी यांच्या तज्ज्ञांनी तपासणी केली. तसेच, औंध जिल्हा रुग्णालयाच्या डॉक्टरांच्या उपस्थितीत संपूर्ण आरोग्य तपासणी करण्यात आली, ज्यामध्ये शालेय मुलांच्या दृष्टी, दात, त्वचा आणि सामान्य शारीरिक आरोग्याची पाहणी केली गेली.सर्व मुलांचा अहवाल निरोगी व आरोग्यदायी आला असून, कुठल्याही गंभीर आजाराची नोंद नाही असे डॉक्टरांच्या अहवालात दिसून आले

महानगरपालिका शिक्षण विभाग दरवर्षी शाळांमध्ये आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी व विद्यार्थ्यांच्या आरोग्याची तपासणी करण्यासाठी आरोग्य तपासणी शिबीर आयोजित केले जाते. विद्यार्थ्यांचे आरोग्य वेळेवर तपासणे हे त्यांच्या शारीरिक व शैक्षणिक विकासासाठी अत्यंत आवश्यक आहे.
महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी पालकांना आवाहन केले आहे की, आपल्या मुलांना शाळेत नियमित पाठवून या आरोग्य तपासणीत सहभागी करावे, जेणेकरून त्यांचे आरोग्य वेळेवर लक्षात येईल आणि आवश्यक उपचार वेळेत करता येतील.

शाळेतील मुलांचे आरोग्य तपासणे हे केवळ आजची काळजी नाही, तर त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी केलेली महत्त्वाची तयारी आहे. पालकांनी आपल्या मुलांना शाळेत नियमित पाठवून या आरोग्य तपासणीत सहभागी करावे, जेणेकरून लहान लक्षणांनाही वेळेत ओळखता येईल आणि आवश्यक उपचार वेळेवर करता येतील. मुलांचे शारीरिक तसेच मानसिक विकास सुनिश्चित करणे हे आपले सामूहिक कर्तव्य आहे.

– प्रदीप जांभळे पाटील, अतिरिक्त आयुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका

 

विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर लक्ष ठेवणे म्हणजे त्यांच्या संपूर्ण शारीरिक आणि शैक्षणिक विकासाची काळजी घेणे. यासाठी शाळा आणि पालकांनी मिळून सक्रिय सहभाग घेतला पाहिजे. आरोग्य तपासणी शिबीरातून मुलांचे आरोग्य वेळेवर तपासले जाऊन त्यांचे पोषण, दृष्टी, दात, त्वचा व इतर शारीरिक स्वास्थ्य सुनिश्चित होते. अशा कार्यक्रमांमुळे मुलांना निरोगी जीवनशैली शिकता येते .

– किरणकुमार मोरे, सहायक आयुक्त, शिक्षण विभाग, पिंपरी चिंचवड महापालिका

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!