पिंपरी चिंचवड शहरातील भारतीय जनता पक्षाचे उद्योग आघाडी पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष निखिल रामचंद्र काळकुटे यांची देवाभाऊ फाउंडेशन महाराष्ट्र राज्य मावळ लोकसभेच्या समन्वयक पदी नियुक्ती करण्यात आली.
नुकतेच देवाभाऊ फाउंडेशन वतीने लोकसभा समन्वयक म्हणून पुणे, मावळ, शिरूर, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, सातारा, माढा या पश्चिम महाराष्ट्र विभागात नियुक्त्या करण्यात आल्या. यामध्ये मावळ लोकसभे करिता निखिल काळकुटे यांची निवड करण्यात आली.
भोसरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश लांडगे यांचे खंदे समर्थक मानले जाणारे निखिल काळकुटे हे पिंपरी चिंचवड शहरातील भारतीय जनता पक्षाचे उद्योग आघाडी पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष आहेत. अनेक वर्षापासून राजकीय व सामाजिक क्षेत्रात त्यांचे उल्लेखनीय कार्य आहे.
नुकतीच देवाभाऊ फाउंडेशन महाराष्ट्र राज्य या संघटनेत संघटनात्मक नियुक्त्या करण्यात आल्या, संघटनेचे संस्थापक मुख्य समन्वयक गजानन जोशी व प्रदेश समन्वयक डॉक्टर आशुतोष घोलप यांनी ही निवड केली आहे.
देवाभाऊ फाउंडेशन संघटनेच्या विविध कार्यात सक्रियतेने कार्य व संघटनेची विचारधारा जोपासण्यासाठी कटिबद्ध राहणार असल्याचे निखिल काळकुटे यांनी आपल्या प्रतिक्रिया देताना सांगितले आहे.