शबनम न्यूज | प्रतिनिधी
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील माजी नगरसेवक सागर गवळी यांच्या पुढाकाराने प्रभाग क्रमांक ५ गंगोत्री पार्क, गवळीनगर भोसरी येथील बॅडमिंटन हॉलच्या पाठीमागे ड्रेनेजचे पाईपलाईन फुटल्याने ड्रेनेजचे पाणी रस्त्यावर येत होते. त्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत होता. नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न उपस्थित झाला होता, नागरिकांना आरोग्याला धोका निर्माण झाला होता. या सर्व बाबीची दखल घेत माजी नगरसेवक सागर गवळी यांनी भोसरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनात महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडून पाठपुरावा करत या ठिकाणचे फुटलेले पाईपलाईन नवीन टाकण्याचे काम सुरू केले. त्यांच्या या कार्यतत्वतेमुळे परिसरातील नागरिकांनी माजी नगरसेवक सागर गवळी यांचे आभार व्यक्त केले.
यावेळी भाजपच्या कार्यक्षम पदाधिकारी कविताताई कडू-पाटील उपस्थित होत्या. त्यांनीही सदर कामाबाबत पालिकेच्या कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले.