शबनम न्यूज | प्रतिनिधी
अनुसूचित जाती कल्याण समिती सध्या तीन दिवसांच्या पुणे जिल्हा दौऱ्यावर आहे. या दौऱ्याचा एक महत्त्वाचा भाग म्हणून, आज समितीने महावितरण विभागातील एकूण २८१ नियुक्त्यांपैकी, अनुसूचित जाती (SC) प्रवर्गातील ५६ उमेदवारांना नियुक्तीपत्रे समिती अध्यक्ष नारायण जी कुचे आमदार अमित गोरखे
व सर्व सदस्यांच्या हस्ते प्रदान केली.
महावितरणचे मुख्य अभियंता ज्ञानदेव पडळकर यांनी केलेल्या कामाचे देखील कौतुक यावेळी करण्यात आले.
यावेळी माहिती देताना समिती अध्यक्ष नारायण कुचे साहेब व सदस्य आमदार अमित गोरखे यांनी या नियुक्त्यांबद्दल माहिती देताना सांगितले की, “या नियुक्त्यांमुळे अनुसूचित जाती प्रवर्गातील तरुणांना खऱ्या अर्थाने न्याय मिळाला आहे आणि त्यांच्यासाठी रोजगाराच्या संधींमध्ये वाढ झाली आहे. हा उपक्रम समाजातील वंचित घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी महत्त्वाचे पाऊल आहे.”
या दौऱ्यादरम्यान समितीमार्फत पदोन्नती, आरक्षण, अनुशेष, आणि जात पडताळणी यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर माहिती घेतली जाणार आहे. तसेच, अनुसूचित जातीच्या कल्याणासाठी राबवण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजना आणि विकासकामांची शासनाच्या धोरणांनुसार अंमलबजावणी होत आहे की नाही, याची प्रत्यक्ष पाहणी केली जाईल.
समितीचे अध्यक्ष ना. नारायणजी कुचे आणि सदस्य आमदार अमित गोरखे यांनी या दौऱ्याची माहिती दिली. या समितीमध्ये आमदार अमोल मिटकरी, तानाजी मुटकुले, भिमराव केराम, अशोक माने, श्याम खोडे, मंगेश कुडाळकर, नरेंद्र भोंडेकर, संजय बनसोडे, सचिन पाटील, गजानन लवटे, संजय मेश्राम आणि प्रज्ञा सातव हे सदस्य सहभागी आहेत. हा दौरा अनुसूचित जाती समाजाच्या विविध प्रश्नांचा गंभीरतेने आढावा घेऊन, त्यावर ठोस कार्यवाही करण्यासाठी शासन यंत्रणेला योग्य त्या सूचना देण्यासाठी आयोजित करण्यात आला आहे.