मोशी , प्रतिनिधी
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पक्षाच्या वतीने सेवा पंधरवडा अभियान सुरू आहे या निमित्ताने मोशी परिसरात भोसरी विधानसभा चे आमदार महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनात , प्राध्यापक राजेश सस्ते यांच्या वतीने भव्य असे आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले IIMS मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल यांच्या सहकार्याने परिसरातील रहिवासींसाठी लहान मुले व महिलांसाठी हे आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते.
यामध्ये अनेक महिलांनी मुलांनी विविध आजारांवरील निदान तसेच मोफत आरोग्य तपासणी करून घेतली. या आरोग्य शिबिराला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला.
यावेळी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे मा.महापौर नितीनआप्पा काळजे, कामगार नेते सचिन भैय्या लांडगे,अजितभाऊ बुर्डे, योगेश तळेकर,रमेश वहिले, गणेश सस्ते, सुनील आण्णा काटे, मा.नगरसेविका सारिकाताई बोऱ्हाडे, सौ.वंदनाताई आल्हाट, कविताताई आल्हाट, विजयाताई आल्हाट,पै नितीन लांडगे ,युवराज लांडे ,मा.नगरसेवक अरुण बोऱ्हाडे,निखिल बोऱ्हाडे, निलेश बोराटे ,दत्ता मोकाशी यांच्यासह इतर पदाधिकारी कार्यकर्त्यांसह परिसरातील गरजू रुग्णांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.