spot_img
spot_img
spot_img

विठ्ठल प्रतिष्ठानच्या नवरात्र उत्सवासाठी अ क्षेत्रीय कार्यालयाकडून परवानगी नाकारली,निखिल दळवी यांची मनपा आयुक्तांकडे तक्रार

दरवर्षीप्रमाणे याही वर्षी नवरात्र उत्सवासाठी शाळेचे मैदान उपलब्ध करावे निखिल दळवी यांची मागणी

माजी आमदार गौतम चाबुकस्वार यांचेही मनपा आयुक्तांकडे निवेदन

पिंपरी चिंचवड शहरातील विठ्ठल प्रतिष्ठान वतीने दरवर्षी नवरात्र उत्सव शहरातील प्रभाग क्रमांक 14 मधील शितळादेवी मंदिरा मागील वसंत दादा पाटील मराठी व फकीर भाई पानसरे उर्दू मनपा शाळा या मैदानावर नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न होत असतो याही वर्षी नवरात्र उत्सवाकरिता विठ्ठल प्रतिष्ठान वतीने अ प्रभाग कार्यालयाकडे शाळेचे मैदान उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली परंतु यावर्षी शाळेच्या मैदानात नवरात्र उत्सवासाठी परवानगी देण्यात येणार नसल्याचे क्षेत्रीय अधिकारी यांच्या वतीने सांगण्यात आले.

याबाबत निखिल दळवी यांनी मनपा आयुक्त यांच्याकडे तक्रार केली आहे या तक्रारीत निखिल दळवी यांनी नमूद केले की प्रभाग क्रमांक 14 मधील शितळादेवी मंदिरामागील वसंतदादा पाटील मराठी व फकीर भाई पानसरे उर्दू मनपा शाळा मैदानावर दरवर्षी सालाबाद प्रमाणे मोठ्या उत्साहात नवरात्र उत्सव कार्यक्रम साजरा केला जातो आमच्या नवरात्र उत्सव कार्यक्रमामुळे सदर मैदानाच्या शाळेला कोणताही त्रास होत नाही आमच्या नवरात्र उत्सव कार्यक्रमाचा मंडप मैदानाच्या एका बाजूला घातला असतो व मैदानाच्या बाजूने मंडप घातलेला असतो दिवसभर सदर मैदान हे पूर्ण पणे मोकळेच असते नवरात्र उत्सव कार्यक्रमाची वेळ सायंकाळी 7 वाजेपासून रात्री 10 वाजेपर्यंत अशी असते त्यामुळे शाळा सुरू असताना मैदान पूर्णपणे मोकळे असते शाळेला व शाळेच्या विद्यार्थ्यांना आमच्या कार्यक्रमाचा कोणता ही त्रास होत नाही.
याही वर्षी नवरात्र उत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे सर्व तयारी करण्यात आली आहे नवरात्र उत्सव कार्यक्रमासाठी मराठी व उर्दू शाळेचे मैदान वर नवरात्र उत्सव कार्यक्रम करण्यासाठी आम्ही आमच्या धर्मदाय नोंदणीकृत संस्था रजिस्टर नंबर महा/292/2019/पुणे
विठ्ठल प्रतिष्ठानच्यावतीने परवानगी घेत असतो याही वर्षी आम्ही सदर कार्यक्रमासाठी परवानगीचा अर्ज ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने लेखी अ. क्षेत्रीय कार्यालय निगडी यांच्या कडे केला होता पण अ.क्षेत्रीय कार्यालय निगडी क्षेत्रीय अधिकारी यांच्याकडून आम्हाला तोंडी सांगण्यात आले आहे की शाळेच्या मैदानावर या वर्षी नवरात्र उत्सव कार्यक्रम करण्यासाठी परवानगी देण्यात येणार नाही असे अचानक धार्मिक कार्यक्रम करण्यासाठी परवानगी देण्यात येणार नाही , सदर मैदानावर दरवर्षी गणेशोत्सव कार्यक्रम करण्यासाठी सदर मैदान अ.क्षेत्रीय कार्यालय यांच्याकडून गणेशोत्सव कार्यक्रमाला परवानगी देण्यात येते व आत्ता मागील 2025 ऑगस्ट महिन्यामध्ये गणेश उत्सव कार्यक्रम करण्यासाठी सदर शाळेचे मैदान गणेशोत्सव कार्यक्रम करण्यासाठी परवानगी देण्यात आले होते एकच महिना होऊन लगेच दुसऱ्या धार्मिक कार्यक्रमासाठी परवानगी नाकारण्यात कशी येते मग नवरात्र उत्सव ही धार्मिक कार्यक्रम आहे मग परवानगी नाकारण्यात का येत आहे तरी विनंती आहे दरवर्षी नवरात्र उत्सव कार्यक्रम करण्यासाठी सदर मराठी व उर्दू शाळा मैदानावर धार्मिक कार्यक्रम करण्यासाठी तात्पुरत्या स्वरूपात सर्वांना परवानगी देण्यात यावी सदर मैदानावर आम्ही कोणताही व्यवसायासाठी परवानगी मागत नाही सदर मैदानावर दरवर्षी आम्ही हा नवरात्र उत्सव कार्यक्रम करतो आम्हाला पर्यायी जागा उपलब्ध नाही आम्ही कार्यक्रम रद्द ही करू शकत नाही कारण पूर्ण तयारी झाली आहे अचानक नवरात्र उत्सव कार्यक्रम रद्द करणे असे योग्य ठरणार नाही त्यामुळे याही वर्षी आम्हाला नवरात्र उत्सव कार्यक्रम करण्यासाठी परवानगी मिळावी असे निखिल दळवी यांनी सांगितले तर या बाबत पिंपरी विधान सभे चे माजी आमदार गौतम चाबुकस्वार यांनी ही मनपा आयुक्तांकडे निवेदन करून नवरात्र उत्सव कार्यक्रम करण्यासाठी सदर शाळेचे मैदान मिळावे असे निवेदन दिले आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!