spot_img
spot_img
spot_img

भाजपा युवा मोर्चाच्या वतीने रविवारी ‘नमो युवा रन’ मॅरेथॉन आयोजन

“नमो युवा रन” – ‘एक दौड मोदीजी के नाम’
शबनम न्यूज | प्रतिनिधी

भारतीय जनता युवा मोर्चा पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त ‘नमो युवा रन’ मॅरेथॉन  आयोजन करण्यात आले आहे.

ही मॅरेथॉन रविवार, दि. २१ सप्टेंबर रोजी सकाळी ६ वाजता पिंपळे सौदागर येथील लिनीयर गार्डन, कोकणे चौक ते ८ टु ८० पार्क  येथे केले आहे.

या कार्यक्रमाचे आयोजन भाजप महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली व पिंपरी चिंचवड भाजपा शहर अध्यक्ष शत्रुघ्न काटे यांच्या अध्यक्षतेखाली आणि पिंपरी चिंचवडचे माजी पोलीस आयुक्त आयपीएस अधिकारी कृष्ण प्रकाश यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे.

त्याचप्रमाणे आमदार महेश लांडगे, आमदार शंकर जगताप, आमदार उमा खापरे, आमदार अमित गोरखे तसेच भाजप युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष श्री.अनुप मोरे, भाजपा युवा मोर्चा पिंपरी चिंचवड अध्यक्ष दिनेश यादव, भाजपा युवा मोर्चा सरचिटणीस सुदर्शन पाटसकर, नमो युवा रनचे संयोजक अमृत मारणे, युवा मोर्चा प्रदेश सचिव अजित कुलथे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

युवकांमध्ये व्यसनमुक्तीचा संदेश पोहोचवणे, देशभक्ती आणि निरोगी जीवनशैलीचा प्रसार करणे हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे. ही मॅरेथॉन रन सर्व वयोगटातील स्पर्धकांसाठी आयोजित केली असून सहभागी स्पर्धकांना नोंदणी व प्रवेश विनामूल्य आहे.

स्पर्धेचे आयोजक भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने करण्यात आले असून जास्तीत जास्त युवकांनी व नागरिकांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे असे आवाहन भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष अनुप मोरे यांनी केले आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!