शबनम न्यूज | प्रतिनिधी
थोर समाज सुधारक केशव सीताराम उर्फ प्रबोधनकार ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतर्फे अभिवादन करण्यात आले. महापालिकेच्या सह आयुक्त मनोज लोणकर यांनी पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीतील केशव सीताराम उर्फ प्रबोधनकार ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, नगररचना विभागाच्या कार्यालयीन अधिक्षक आशा लांडे, मुख्य लिपिक सुरेखा सोमवंशी तसेच महानगरपालिकेच्या विविध विभागांतील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.