spot_img
spot_img
spot_img

वीजपुरवठा सुरळीत करा – निखिल दळवी

शबनम न्यूज | प्रतिनिधी

पिंपरी चिंचवड शहरात रोज वारंवार वीज पुरवठा खंडित होत असून लवकरात लवकर उपाययोजना करून वीजपुरवठा सुरळीत करण्यात यावा, अशी मागणी निखिल दळवी (शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उपशहर प्रमुख – युवासेना पिंपरी चिंचवड शहर यांनी मा. कार्यकारी अभियंता , महावितरण कार्यालय, भोसरी यांना निवेदनाद्वारे केली आहे.

दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे कि, प्रभाग क्रमांक 14 मधील दत्तवाडी विठ्ठलवाडी विवेक नगर तुळजा वस्ती एकता नगर रुपेश कॉलनी टेल्को कपूर कॉलनी उंबरवाडी श्रीकृष्ण क्रांती नगर बौद्ध वस्ती सुभाष पांढरकर नगर भंगारवाडी खडीमशीन परिसर काळभोरनगर रामनगर मोहननगर फुलेनगर गवळीवाडा चिंचवड स्टेशन दावा बाजार साईबाबा नगर या सर्व परिसरामध्ये रोज वारंवार वीज पुरवठा खंडित होत आहे त्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे लहान मोठ्या मुलांच्या परीक्षा सुरू आहेत त्यांना देखील परीक्षेचा अभ्यास करताना वीज पुरवठा खंडित असल्यामुळे अभ्यास करताना अडचणी निर्माण होत आहेत त्यांना देखील वारंवार वीज पुरवठा खंडित होण्यामुळे त्रास होत आहे बऱ्याचशा लोकांना वर्क फॉर्म होम आहे म्हणजेच त्यांना घरी बसून काम करावे लागत असते कम्प्युटर लॅपटॉप इंटरनेट त्यासाठी वीज पुरवठ्याची आवश्यकता लागते वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्यामुळे त्यांचा देखील कामाचा खोळंबा होत आहे चार चार पाच पाच तास वीज पुरवठा खंडित होत आहे एम एस ई बी च्या कंप्लेंट नंबर वर तक्रार करण्यासाठी फोन केला तर फोन उचला जात नाही वेळेवर वीज बिल भरून देखील नागरिकांना नियमित वीज पुरवठा होत नाही रोजच सारखा सारखा वीज पुरवठा खंडित होत आहे यावर महावितरण कंपनीने लवकरात लवकर उपाययोजना कराव्यात व वीज बिल नियमित भरणाऱ्या नागरिकांना पुरेसा वीजपुरवठा उपलब्ध करून द्यावा जेणेकरून नागरिकांना वीज पुरवठा खंडित होण्याच्या त्रास सहन करावा लागणार नाही तरी लवकरात लवकर वारंवार वीज पुरवठा खंडित होणे यावर त्वरित उपाययोजना कराव्यात व लवकरात लवकर वरील सर्व परिसरामध्ये वीज पुरवठा सुरळीत करावा, असेही सदर निवेदनात दळवी यांनी नमूद केले आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!