शबनम न्यूज | प्रतिनिधी
पोलीस कर्मचाऱ्याला धक्काबुक्की करून शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. सिंहगड रस्त्यावरील धायरी भागात ही घटना घडली. याबाबत पोलीस शिपाई मोहन मिसाळ यांनी नांदेड सिटी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
याप्रकरणी गणेश संभाजी पाटील (४०), दिलीप संभाजी पाटील ( ३८), र्कीती संजय बोरसे (४०), भाविका संजय बोरसे ( २०, चौघे रा. लायगुडे वस्ती, धायरी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. मिसाळ हे नांदेड सिटी पोलीस ठाण्यात नियुक्तीस आहेत. आरोपी पाटील, बोरसे यांच्यातील वाद मिटविण्यासाठी ते लायगुडे वस्ती परिसरातील एका सोसायटीत गेले होते. आरोपींनी सोसायटीच्या तळमजल्यावर मिसाळ यांना धक्काबुक्की केली, तसेच जिवे मारण्याची धमकी दिल्याचे मिसाळ यांनी फिर्यादीत म्हटले आहे. सहायक पोलीस निरीक्षक पाटील तपास करत आहेत.