शबनम न्यूज , प्रतिनिधी : भारत पाकिस्तान क्रिकेट सामना आशिया कप आज दुबई येथे खेळला जात आहे. भारताने पाकिस्तान सोबत सर्व संबंध तोडले आहे तर क्रिकेट हा खेळ तरी का खेळायचा ? असा प्रश्न उपस्थित करत या विरोधात निषेध व्यक्त करण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने राज्यव्यापी आंदोलन होत आहे.
पिंपरी चिंचवड शहरात “माझं कुंकू माझा देश आंदोलन” शिवसेना पक्षाच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात करण्यात आले. पहेलगाम आतंकवादी हल्ल्यात हात असलेल्या पाकिस्तान विरुद्ध क्रिकेट खेळण्यास परवानगी देणाऱ्या दुट्टप्पी केंद्र सरकार विरोधात हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाच्या वेळी जिल्हाप्रमुख माजी आमदार गौतम चाबुकस्वार, जिल्हा संघटिका अनिता तुतारे
शहर प्रमुख रुपाली ताई आल्हाट ,नगरसेविका मीनल यादव, उपजिल्हाप्रमुख रोमी संधू विधानसभा प्रमुख हरेश नखाते,युवासेना समन्वयक निखिल दळवी, उपशहर युवासेना,शिवाजी कुरहडकर, दत्ताराम साळवी, विभाग प्रमुख गजानन धावडे,नाथाभाऊ खांडेभराड सचिन खोमणे, रविराज मांडवे,दिलीप दंडवते,तुषार नवले, संतोष म्हात्रे, विभाग प्रमुख संदीप भालके, विजय साने, कृष्णा येळवे, भरत शिंदे, ज्ञानेश्वर शिंदे,कल्पना शेटे ,योगिनी मोहन ,ज्योती भालके ,सुषमा शेलार ,गौरी घंटे,कलावती नाटेकर ,तसलीम शेख ,सुषमा आल्हाट ,सारीका जांभुळकर असंख्य शिवसैनिक उपस्थित होते.