शबनम न्यूज, प्रतिनिधी: सह दुय्यम निबंधक कार्यालयात दस्त नोंदणीस बेकायदेशीरपणे नकार देत या कार्यालयात प्रचंड भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप ॲड. बाळासाहेब थोपटे यांनी केला आहे.
याबाबतची तक्रार त्यांनी थेट नोंदणी महानिरीक्षक पुणे यांना केली आहे. आपल्या तक्रारीत ॲड.बाळासाहेब थोपटे यांनी नमूद केले आहे की दुय्यम निबंधकाचे काम सरकारला महसूल गोळा करून देण्याचे आहे. जागेच्या मालकीबाबत खात्री करण्यास त्यांना कोणताही कायदेशीर अधिकार नाही. मात्र दुय्यम निबंधक नको त्या कागदपत्रांची मागणी करतात तसेच सदर मिळकतींचे मालकी हक्क तपासत बेकायदेशीरपणे दस्त नोंदविण्यास नकार देतात. त्यामुळे शासनाचे फार मोठे आर्थिक नुकसान होत आहे. परंतु पैसे दिल्यानंतर असे दस्त नोंदविले जात आहे. यामध्ये नागरिकांची करोड रुपयांची लूट नोंदणी कार्यालयाकडून केली जात आहे. अशी तक्रार ॲड. बाळासाहेब थोपटे यांनी केली आहे.
आपल्या तक्रारीत ॲड. बाळासाहेब थोपटे यांनी माहीतीसाठी न्यायालयाचे काही निवाडे दिले आहे. या मध्ये १. अश्विनीकुमार क्षिरसागर वि. महाराष्ट्र शासन यामध्ये सांगण्यात आले आहे की, दस्त नोंदविणे हे दुय्यमनिबंधकाचे कर्तव्य आहे आणि नाकारला तर गुन्हा आहे.
२. चेअरमन / सेक्रेटरी दिप अपार्टमेंट को. ऑप. हौसिंग सोसायटी वि. महाराष्ट्र शासन या केसमध्ये असे सांगितले आहे की, दुय्यम निबंधक यांना कोर्टासारखे अधिकार दिले जावु शकत नाहीत.
३. सत्यपाल आनंद वि. एम.पी.या केसमध्ये सुप्रिम कोटीने असे सांगितले आहे की, दुय्यम निबंधकाने नोंदणी कायदयाच्या क्र. ३४ व ३५ प्रमाणे नोंदणी केली पाहिजे.
४. लक्ष्मी ईश्वर मोरे वि. महाराष्ट्र शासन या केसमध्ये मुंबई उच्च न्यायालयाने असे आदेशीत केले आहे की, जरी बेकायदेशीर बांधकाम असेल तरी देखील दुय्यम निबंधकाने दस्त नोंदविले पाहिजेत.
मा. न्यायालयाच्या मनाई हुकुम अथवा निर्बधाशिवाय दस्त नोंदणी रोखता येत नाही. असा कायदा असताना देखील दुय्यम निबंधक दररोज कायदयाचे उल्लंघन, दिशाभुल व फसवणुक करीत आहेत तसेच कायदयाचा व मे. न्यायालयाचा सुध्दा अवमान करत आहेत.
तरी पुणे व पिंपरी चिंचवडमधील सर्व सह दुय्यम निंबधक (वर्ग-२) करत असलेल्या भ्रष्टाचाराची स्वतंत्र समीती नेमुन त्वरीत चौकशी करण्यात यावी तसेच जे सब रजिस्ट्रार विनाकारण दस्त नोंदणीस नकार देतात त्यांची त्वरीत चौकशी करून त्याबाबत योग्य ती कायदेशिर कारवाई संबंधित सह दुय्यम निंबधका विरूध्द करावी असे ॲड. बाळासाहेब थोपटे यांनी तक्ररीत म्हंटले आहे.