कस्तुरी राईस फाउंडेशन आणि मानसी फिल्म प्रोडक्शन वतीने स्पर्धेचे आयोजन
शबनम न्यूज | प्रतिनिधी
कस्तुरी राईस फाउंडेशन आणि मानसी फिल्म प्रोडक्शन आयोजित Miss & Mrs India Cinema Queen २०२५ या सौंदर्य स्पर्धेचे आयोजन रविवार दिनांक 5 ऑक्टोंबर रोजी पिंपरी चिंचवड शहरातील ग. दि. माडगूळकर सभागृह,आकुर्डी, पुणे येथे संपन्न होत आहे.अशी माहिती कस्तुरी राईस फाउंडेशनच्या अध्यक्षा विजयाताई मानमोडे यांनी दिली आहे.
या कार्यक्रमाबाबत अधिक माहिती देताना विजयताई मानमोडे यांनी सांगितले की,कस्तुरी राईस फाउंडेशनने मागील 2018 पासून महाराष्ट्रात प्रथम अस्सल मराठमोळी सौंदर्य स्पर्धेचा पाया रचला. महाराष्ट्रातील महिला मुलींना सौंदर्य क्षेत्रात भव्य व्यासपीठ उभारले. महाराष्ट्र सौंदर्य सम्राज्ञी होण्याचा सन्मान मिळवून दिला.येत्या 5 ऑक्टोबर रोजी संपन्न होत असलेले या सौंदर्य स्पर्धे मधून निवडून आलेल्या सौंदर्यवतींना सौंदर्य क्षेत्रात तसेच चित्रपट क्षेत्रात करिअर करण्याची संधी उपलब्ध होणार आहे.
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे पिंपरी चिंचवड शाखेचे अध्यक्ष तथा माजी विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर असणार आहेत. या भव्य दिव्य सौंदर्य स्पर्धेचे मीडिया पार्टनर महाराष्ट्राची लोकप्रिय पिंपरी चिंचवड शहरातील वृत्तसंस्था शबनम न्यूज मीडिया ग्रुप, यांच्यासह अनेक सामाजिक संस्था, व्यावसायिक शैक्षणिक क्षेत्रातील अनेक संस्थांचा सहभाग असणार आहेत.