शबनम न्यूज | प्रतिनिधी
काँग्रेस पक्षाने बिहार निवडणुकीच्या प्रचारादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्रींचा अपमान केल्याच्या निषेधार्थ भारतीय जनता पक्षाने आज पिंपरी- चिंचवडमध्ये जोरदार आंदोलन केले. “स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी” या भारतीय संस्कृतीचा आणि मातृशक्तीचा अवमान करणाऱ्या काँग्रेसच्या विचारधारेचा निषेध करण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनात शहरातील भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि विशेषतः महिलांचा मोठ्या संख्येने सहभाग होता. पिंपरी येथील भाजपा पक्ष कार्यालयाजवळ सकाळी १० वाजता हे आंदोलन झाले.
शहराध्यक्ष श्री.शत्रुघ्न काटे यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. “काँग्रेसची विचारधारा नेहमीच विष पेरणारी असून, ती नारीशक्तीचा अवमान करणारी आहे,” असा आरोप त्यांनी केला.
पंतप्रधान हे देशाचे असतात आणि त्यांच्या आईबद्दल अपशब्द वापरणे, तसेच त्यांचे वाईट पद्धतीने चित्र रेखाटणे हा देशातील सर्व मातांचा अपमान आहे, अशी भूमिकाही काटे यांनी मांडली. “ही मातृशक्ती कधीही सहन करणार नाही,” असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.
या आंदोलनातून काँग्रेसच्या या कृत्याचा तीव्र निषेध करण्यात आला. आंदोलनकर्त्यांनी घोषणाबाजी करत काँग्रेसविरोधात संताप व्यक्त केला. कोणत्याही व्यक्तीने मातृशक्तीचा अनादर केल्यास तो सहन केला जाणार नाही, असा ठाम संदेश या आंदोलनातून देण्यात आला. तसेच,जनतेलाही मातृशक्तीच्या सन्मानासाठी एकत्र येण्याचे आवाहन करण्यात आले.
या आंदोलनात शहरातील विविध मंडळांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
शहरात ठिकठिकाणी मंडलनिहाय आंदोलने पार पडल्याने काँग्रेसविरोधात तीव्र रोष दिसून आला. मातृशक्तीच्या सन्मानासाठी भाजपाचे हे आंदोलन लक्षवेधी ठरले असून भाजपाच्या महिला पदाधिकाऱ्यांकडून काँग्रेस पक्ष कार्यालयात बांगड्या पाठविण्यात येणार आहे.
यावेळी संघटन सरचिटणीस मोरेश्वर शेडगे, सरचिटणीस वैशाली खाडये,सरचिटणीस मधुकर बच्चे,उपाध्यक्ष राम वाकडकर,राजू दुर्गे, युवा मोर्चा अध्यक्ष दिनेश यादव,प्रवक्ते कुणाल लांडगे, अजित बुर्डे, रमेश वहिले,विजय शिणकर,राजेंद्र बाबर,मंडल अध्यक्ष सोमनाथ तापकीर,मोहन राऊत,गणेश ढोरे,अनिता वाळुंजकर,नामदेव पवार,हरीश मोरे,इंजी.आघाडी प्रमुख संतोष भालेराव,डॉक्टर सेल अध्यक्ष डॉ.अमित नेमाने,दिव्यांग सेल अध्यक्ष अंकुश शिर्के,वैद्यकीय प्रकोष्ठ अतुल गाडगे, ट्रान्सपोर्ट प्रकोष्ट संयोजक सुनील लांडगे,संतोष टोणगे,सचिन राऊत, खंडूदेव कठारे,ॲड.हर्षद नढे, कायदा आघाडी अध्यक्ष ॲड. गोरख कुंभार,ॲड.युवराज लांडे,सोशल मीडिया सेल अध्यक्ष सागर बिरारी,जिल्हा कार्यकारणी सदस्य सुनील लांडगे, कविता हिंगे,दिपाली कलापुरे,रेणुका हेगडे,सीमा बोरसे,सीमा चव्हाण, सुनीता जगताप,मंजू गुप्ता,अनघा रुद्र, रंजनाताई जगताप, नीताताई भालेराव,अनिता चोपडे,लक्ष्मी काची आणि कार्यकर्ते उपस्थित होते.