शबनम न्यूज | प्रतिनिधी
पैसे देण्यास नकार दिल्याच्या कारणावरून १७ वर्षीय मुलाला मारहाण करून मोबाइल व मोटारसायकल चोरून नेली. ही घटना बुधवारी (दि. १०) दुपारी अंकुश चौक, ओटा स्कीम निगडी येथे घडली. याप्रकरणी यश आकाश खंडाळे (वय २३), हेमंत आकाश खंडाळे (वय २५), सोहेल संतोष जाधव (वय २०) आणि ऋषी यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
सोहेल जाधव याला अटक करण्यात आली आहे. फिर्यादी मुलाने आरोपींना पैसे देण्यास नकार दिल्याने आरोपींनी त्याला लोखंडी फायटर आणि कोयत्याच्या उलट्या बाजूने मारहाण केली. तसेच, सर्व आरोपींनी मिळून त्याला व त्याच्या मित्राला लाथाबुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ केली. त्यांनी मुलाचा मोबाइल, मोटारसायकल आणि त्याच्या मित्राचा मोबाइल जबरदस्तीने चोरून नेला. शस्त्रे दाखवून परिसरात दहशत निर्माण केली.