spot_img
spot_img
spot_img

तळेगाव स्टेशन येथे कंटेनरच्या धडकेने दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू

तळेगाव स्टेशन येथे वडगाव-तळेगाव रस्त्यावर कंटेनरने धडक दिली. यात डोक्यास मार लागून गंभीर जखमी झालेल्या दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाला. निखिल रामदास ननावरे (३०, रा. मलठण, ता. फलटण, जि. सातारा) असे मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे.

चंद्रप्रकाश रामकृपाल यादव (२८, रा. सुलतानपूर, जि. प्रितीपूर, उत्तरप्रदेश) याच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. दत्तात्रय किसन राऊत (३४, रा. भिसे काॅलनी, वराळे, ता. मावळ) यांनी याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी दत्तात्रय यांचा मेव्हणा निखिल ननावरे हे दोन दिवसांपूर्वी कामाच्या शोधानिमित्त फिर्यादी दत्तात्रय यांच्याकडे राहण्यास आले होते. दरम्यान, रविवारी रात्री किराणा साहित्य घेण्यास निखिल घरातून बाहेर पडले. त्यावेळी वडगाव-तळेगाव रस्त्यावर चंद्रप्रकाश यादव याने त्याच्या ताब्यातील कंटेनर भरधाव चालवून निखील यांच्या दुचाकीला धडक दिली. कंटेनरच्या धडकेने निखिल यांच्या डोक्यास मार लागून ते गंभीर जखमी झाले. त्यांना रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच निखिल यांचा मृत्यू झाल्याचे डाॅक्टरांनी घोषित केले

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!