शबनम न्यूज | प्रतिनिधी
आपल्या आसपास अनेक महिला अशा आहेत की, ज्यांना टू व्हीलर स्कुटी, वाहन चालवणे येत नाही त्यामुळे अनेक महिलांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. वाहन चालवता येत नसल्यामुळे बाजारात जाणे, कामावर जाणे किंवा इतर ठिकाणी जाण्या येण्यासाठी सार्वजनिक वाहनांशिवाय पर्याय राहत नाही, आणि यामुळे अनेक महिलांचा वेळही वाया जातो, अनेकांना दगदग सहन करावी लागते,अशा वाहन चालवता येत नसलेल्या महिलांसाठी थेरगाव परिसरात फक्त महिलांसाठी स्कुटी प्रशिक्षण शिबिर संपन्न होत आहे.या स्कुटी प्रशिक्षण शिबिरा चे उद्घाटन मोठ्या उत्साहात संपन्न झाले.
थेरगाव परिसरातील महिलांसाठी चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार शंकर जगताप यांच्या मार्गदर्शनाने व माजी नगरसेविका मनिषाताई प्रमोद पवार व भाजपच्या महिला आघाडी थेरगावच्या अध्यक्ष करिश्माताई सनी बारणे यांच्या विशेष सहकार्याने सदर स्कुटी प्रशिक्षण शिबिर संपन्न होत आहे.
या शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी माजी नगरसेवक अभिषेक बारणे, माजी नगरसेवक सिद्धेश्वर बारणे, माजी स्वीकृत सदस्य संदीप गाडे, सामाजिक कार्यकर्त्या सोनाली गाडे, सनी बारणे, सामाजिक कार्यकर्ते प्रमोद पवार,विनोद भाऊ पवार, सीमाताई चव्हाण,रितूताई कांबळे, वैशालीताई जाधव, मंजू गुप्ता, रेणुका ताई हेगडे, स्कुटी प्रशिक्षक शर्मा सर, प्रेम पवार, राजेश भंडारे ,राणी शर्मा आदी मान्यवर व थेरगाव परिसरातील अनेक महिला उपस्थित होत्या.